राज्यसेवेत १.७७ लाख पदे रिक्त!​

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

राज्यसेवेत १.७७ लाख पदे रिक्त!​

 

४४ हजार अधिकाऱ्यांची गरजगृहआरोग्यशिक्षण विभागांत कर्मचाऱ्यांची वानवा

नागरिकांना तत्पर सेवा मिळण्यासाठी सेवा हमी कायदा केला जातो, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर वानवा आहे. राज्य शासन आणि जिल्हा परिषदांमध्ये सध्या १ लाख ७७ हजार पदे रिक्त आहेत. त्यात वर्ग एक व वर्ग दोनच्या ४४ हजार ५९२ रिक्त पदांचा समावेश आहे. गृह, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण इत्यादी महत्त्वाच्या विभागांमध्येच मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्य शासनाचे वेगवेगळे विकासांचे प्रकल्प व कल्याणकारी योजना राबविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्ग किती असावा, याचा आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. त्याचा वेळोवेळी आढावा घेऊन आकृतिबंधात सुधारणा केली जाते; परंतु गेल्या काही वर्षांत राज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे कारण सांगून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नोकरभरतीवर र्निबध घालण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य शासन आणि जिल्हा परिषदांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पदे रिक्त राहिली आहेत.

राज्य शासनाच्या २८ विभागांतील व त्यांच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयांमधील एकूण मंजूर पदे, प्रत्यक्ष कार्यरत अधिकारी व कर्मचारी आणि रिक्त पदे किती, याबाबतची ३० सप्टेंबर २०१६ पर्यंतची माहिती उपलब्ध झाली आहे. माहिती अधिकारातून हा संपूर्ण तपशील प्राप्त झाला आहे. राज्य शासन व जिल्हा परिषदांमध्ये १० लाख ५४ हजार ३७६ इतकी मंजूर पदे आहेत. त्यात शासनाच्या ६ लाख ९३ हजार २७७ आणि जिल्हा परिषदांच्या ३ लाख ६१ हजार ९१ पदांचा समावेश आहे. राज्य शासन व जिल्हा परिषदांमध्ये एकूण मंजूर पदांच्या १ लाख ७७ हजार जागा सध्या रिक्त आहेत. त्यात शासनामधील ३७ हजार ९५९ आणि जिल्हा परिषदांमधील ६ हजार ९३३ वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा समावेश आहे.

आकडय़ांच्या भाषेत

सामान्य प्रशासन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार गृह विभागात २३ हजार ९१६, सार्वजनिक आरोग्य विभागात १८ हजार २६१, जलसंपदा विभागात १४ हजार ६१६, कृषी विभागात ११ हजार ९०६, महसूल व वन विभागात ८ हजार ६५८, वैद्यकीय शिक्षण विभागात ६ हजार ४७८, उच्च व तंत्र शिक्षण विभागात ३ हजार २३६ आणि शालेय शिक्षण विभागात ३ हजार २८० पदे रिक्त आहेत.

राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त जागा भरण्याबाबतचे धोरण ठरविण्यात आले आहे. पदोन्नतीने रिक्त जागा भरण्यास कोणतेही बंधन नाही. मात्र सरळसेवेने भरावयाच्या रिक्त जागांबाबत थोडे र्निबध घालण्यात आले आहेत. एकूण मंजूर पदांच्या चार टक्के किंवा रिक्त जागांच्या पन्नास टक्के पदे भरण्यास शासनाची मान्यता आहे    – मुकेश खुल्लर (अप्पर मुख्य सचिव- सामान्य प्रशासन विभाग)

 

Click here to see the ad

 

 

 

Like our Facebook page for jobs updates

Close

The MySQL server is running with the --read-only option so it cannot execute this statement