(News) कॉग्निझंट MNC तून ६,००० कर्मचाऱ्यांना डच्चू

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

 Cognijnt multinational Karmacharhyanna Dchcu

News

कॉग्निझंट MNC तून ६,००० कर्मचाऱ्यांना डच्चू

 

मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू


अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनी 'कॉग्निझंट' ६ हजार कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याच्या तयारीत आहे. ही कर्मचारी कपात कंपनीच्या एकूण मनुष्यबळाच्या २.३ टक्के इतकी आहे. आयटी क्षेत्रात होणाऱ्या वेगवान बदलांना, नव्या डिजीटल सेवांना सामोरे जाताना या कंपनीची दमछाक होत आहे. परिणामी विकासाला खीळ बसल्याने ही कपात केली जाणार आहे. कंपनीचा दरवर्षीचा दोनअंकी वाढदर यंदा ८.६ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या २०१६ मधील वेतनालाही कंपनीला होणाऱ्या तोट्याचा फटका बसला आहे. दरवर्षी काही टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे, पण यावर्षी ती अधिक आहे. तळातल्या १ टक्के कर्मचारीवर्गाची कपात यंदा होणार आहे, कारण यांत्रिकीकरणामुळे या कर्मचारीबळाची आवश्यकता राहिलेली नाही.
गेल्यावर्षी १-२ टक्के तर दोन वर्षांपूर्वी १ टक्का कर्मचारी कपात करण्यात आली होती. ३१ डिसेंबर पर्यंत कंपनीचे जगभरातल्या सर्व कार्यालयात मिळून२ लाख ६० हजार २०० कर्मचारी होते. यापैकी ७२ टक्के म्हणजे १ लाख ८८ हजार कर्मचारी भारतात आहेत. भारतातल्या किती कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. 'मनुष्यबळ व्यवस्थापन धोरणानुसार, आम्ही नियमितपणे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करत असतो. कामानुसार कुशल मनुष्यबळ आहे का हे आम्हाला सातत्याने पाहावे लागते. या प्रक्रियेत काही बदल होत असतात, कर्मचाऱ्यांचे जाणे हा या प्रक्रियेचाच भाग आहे,' असे स्पष्टीकरण कॉग्निझंटच्या प्रवक्त्याने टाइम्स ऑफ इंडियाला इमेलद्वारे दिले.

 

Like our Facebook page for jobs updates

Close

The MySQL server is running with the --read-only option so it cannot execute this statement