रेल्वेची ९० हजार पदांसाठी मेगाभरती; जाणून घ्या परीक्षेचे स्वरुप

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

Railway Recruitment Board Announces Exam Schedule And Pattern

२६ जुलैपासून उमेदवारांना समजेल आपले सेंटर

सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने आपल्या सगळ्यात मोठ्या नोकरभरतीची तारीख जाहीर केली असून तरुणांना त्याचा लाभ घेता येणार आहे. काही दिवसांपूर्वी या परीक्षेच्या फी वरुन झालेला वाद बराच गाजला होता. त्यावरुन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. ९ ऑगस्टपासून परिक्षा सुरु होणार असून त्याची प्रक्रिया काही दिवसावर येऊन ठेपली आहे. आता ही भरती नेमकी कशापद्धतीने होणार, ती नेमक्या किती जागांसाठी होणार आणि या पदांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया काय यांबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

ही रेल्वेकडून घेतली जाणारी परीक्षा ऑनलाईन असेल तसेच ती सर्व महानगरांमध्ये घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. उमेदवारांना देण्यात येणारी प्रश्नपत्रिका १५ भाषांमध्ये असतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवार आपले नाव हिंदी किंवा इंग्रजीशिवाय या १५ भाषांमध्ये लिहू शकतील. या पदांसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ५ ते १२ मार्च होती. तर आता २६ जुलैपासून कोणत्या उमेदवारांचे सेंटर म्हणजेच परीक्षेचे शहर कोणते असेल याबाबतची माहिती समजणार आहे. पहिल्या टप्प्यात २६,५०० जागा भरण्यात येतील असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. यात असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ या पदांसाठी भरती होईल. त्यानंतरच्या टप्प्यात ६२,९०७ पदांसाठी परीक्षा होईल.

अशी असते रेल्वे परीक्षा

– ही परीक्षा एकूण ६० मिनिटांची असून ती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते.

– दिव्यांग व्यक्तींना यामध्ये २० मिनीटांचा अतिरिक्त वेळ दिला जातो.

– उमेदवारांना एक तासात एकूण ७५ प्रश्न सोडवायचे असतात.

– प्रत्येक प्रश्नाला उत्तराचे ४ पर्याय दिलेले असतात.

– चुकीचे उत्तर दिल्यास १/३ गुण वजा होतात.

 

Like our Facebook page for jobs updates

Close