एसटीतल्या सात हजार जागांसाठी ९०० उमेदवारच उत्तीर्ण

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

विनावाहक सेवेचे उद्दिष्ट ठेवलेल्या एसटी महामंडळावर संयुक्त चालक -वाहक पद भरतीत नामुष्की ओढवली आहे. ७,९२९ पदांसाठी झालेल्या परीक्षा व चालक चाचणीत पाचपैकी तीन विभागातून अवघे ९०० जणच अंतिम चाचणी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी आणि ठाणे या दोन विभागांचा निकाल बाकी आहे. विशेष म्हणजे ४४० महिलांचे अर्ज छाननीतच बाद ठरले. पूर्वी आठवी उत्तीर्ण झालेल्यांना चालक पदासाठी अर्ज करता येत होते, मात्र आता किमान दहावी उत्तीर्ण ही अट ठेवल्याने ही परिस्थिती ओढवल्याचीही तक्रार आहे. महामंडळाकडे ३६ हजार चालक आणि ३४ हजार वाहक आहेत. महामंडळाने गेल्या काही महिन्यांपासून विनावाहक शटल सेवा सुरू केली असून या सेवा वाढविण्यावर भर दिला जात आहे. सध्या १,८०० पेक्षा जास्त शटल फेऱ्या होतात. त्यात वाढ करता यावी यासाठी ७,९२९ संयुक्त चालक – वाहक पदे भरण्याचा निर्णय घेतला. यासाठी २८ हजार अर्ज आले होते. पुन्हा भरती! आताच्या भरतीत मिळालेले अपयश पाहता रिक्त जागांसाठी पुन्हा नव्याने भरती होणार असल्याचे समजते. आता सुरू असलेल्या संयुक्त चालक – वाहक पदांच्या भरतीत जेवढय़ा जागा शिल्लक राहतील, त्यासाठी नव्याने भरतीची जाहिरात नवीन वर्षांत काढण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

Like our Facebook page for jobs updates

Close