बँकांच्या परीक्षा मराठीसह तेरा भाषांमधून होणार

By Naukari Adda Team

सध्या इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये या परीक्षा होतात. बँकांच्या परीक्षा यापुढे मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणीपुरी, ऊडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत होतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत ही माहिती दिली. 'स्थानिक तरुणांना योग्य संधी मिळावी, त्यांना रोजगार मिळावा यासाठी बँकांच्या परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये होतील. विभागीय ग्रामीण बँकांमधील अधिकारी आणि सहाय्यक पदांच्या परीक्षांमध्ये हा पर्याय उपलब्ध असेल,' असं सीतारामन म्हणाल्या. बँकांच्या परीक्षा स्थानिक भाषेत घेतल्या जाव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू होती. हा विषय ट्विटरवरदेखील ट्रेंडमध्ये होता. बँकांमधील पदं भरताना स्थानिक भाषेवर प्रभुत्व असावं अशी अट असते. मात्र तरीही बँकांच्या परीक्षा केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये होतात, अशी तक्रार अनेकांनी केली होती. प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा होत नसल्यानं अनेक पात्र उमेदवार बँकेतील नोकऱ्यांपासून दूर राहतात, असं मतदेखील अनेकांनी व्यक्त केलं होतं. गेल्या गुरुवारी काँग्रेस खासदार जी.सी. चंद्रशेखर यांनी बँकेच्या परीक्षा स्थानिक भाषांमध्ये घ्याव्यात अशी मागणी केली होती. कन्नड भाषेतून भाषण करत त्यांनी ही मागणी केली होती. याची दखल घेत सरकारनं बँक भरती परीक्षा 13 भाषेतून घेणार असल्याची घोषणा केली.

Like our Facebook page for jobs updates

Article in English

Bank exam will be conducted in 13 language

By Naukari Adda Team

See this ad in english इथे क्लिक करा