NEET परीक्षेचे प्रवेशपत्र प्रदर्शित, डाउनलोड करा

By Naukari Adda Team


NEET परीक्षेचे प्रवेशपत्र प्रदर्शित, डाउनलोड करा , Display NEET exam tickets, download

नवी दिल्ली: देशात होत असलेल्या विरोधाला डावलून नीट आणि जेईई (NEET and JEE) मुख्य परीक्षा आपल्या निर्धारित वेळेतच होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून घेतली जाणाऱ्या NEET 2020 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आज रिलिज करण्यात आली आहेत. ही परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी देशातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 2846 वरुन वाढवून 3,843 केली आहे. या परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थिंना भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि राज्य सरकारकडून दिलेल्या नियमांचं पालन करने गरजेचं आहे.

आपले प्रवेशपत्र इथून (लिंक) डाउनलोड करा - 

https://ntaneet.nic.in/ntaneet/AdmitCard/AdmitCard.html

 

परीक्षेसाठी कडक नियम
परीक्षार्थिंना परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरु होण्याआधी कमीत कमी दोन तास आधी पोहोचणे आवश्यक आहे. तसेच दोन विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांचं अंतर ठेवलं जावं, पाण्याची बॉटल स्वता आणावी तसेच सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जाणार आहे.

परीक्षेसाठी सेंटर्स वाढवले

 

जेईई आणि नीट परीक्षांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यनिहाय सेंटर्सची लिस्ट घोषित केली आहे. शिक्षण मंत्रालयाकडून घोषित केलेल्या लिस्टमध्ये जेईई परीक्षेसाठी सेंटर्स 570 वरुन वाढवून 660 केले आहेत तर  नीट परीक्षेसाठी सेंटर्स 2846 वरुन वाढवून 3843 केली आहेत.

जेईई मुख्य परीक्षेसाठी नंबर ऑफ शिफ्ट्सही वाढवल्या

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, जेईई परीक्षा एक ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षांसाठी नंबर ऑफ शिफ्ट्स देखील वाढवल्या आहेत. आधी या परीक्षेसाठी आठ शिफ्ट निश्चित केल्या होत्या. आता त्या वाढवून 12 केल्या आहेत.

जेईई मुख्य परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड देखील रिलिज करण्यात आली आहेत. नीट 2020 परीक्षांसाठी देखील अॅडमिट कार्ड या आठवड्यात रिलिज होण्याची शक्यता आहे. एनटीएकडून अॅडमिट कार्ड रिलिज करतेवेळी सांगण्यात आलं होतं की, जवळपास 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेली परीक्षा केंद्रं देण्यात आली आहेत.

 

जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणं शक्य नाही असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केलं आहे. येत्या 13 सप्टेंबरला नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र अजूनही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. एनटीएने परीक्षा सेंटर इत्यादींच्या बाबतीत आधीच विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाने कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षा स्थगित करण्याची याचिका फेटाळली आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीतही जनजीवन सुरु आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निर्णयामध्ये दखल देऊन विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात टाकणार नाही, असं कोर्टाने म्हटलं.

 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षांना दोनदा स्थगिती देण्यात आली आहे. आधी या परीक्षा मे महिन्यात नियोजित होत्या. त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात पार पडणार होती. मात्र कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जुलै महिन्यातली परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. आता जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर रोजी आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Display NEET exam tickets, download

By Naukari Adda Team


New Delhi: The NEET and JEE main exams will be held on time, overcoming the opposition in the country. Admit cards for the NEET 2020 exam conducted by the National Testing Agency have been released today. The exam will be held on September 13, 2020 at examination centers in various cities across the country. Due to the outbreak of Corona virus, the number of examination centers has been increased from 2846 to 3,843. For this exam, all the candidates are required to follow the rules given by the Ministry of Home Affairs and the State Government of India.

Download your ticket here (link) -

https://ntaneet.nic.in/ntaneet/AdmitCard/AdmitCard.html

Strict rules for exams
Candidates must arrive at the examination centers at least two hours before the commencement of the examination. Also, a distance of 6 feet should be kept between the two students, water bottle should be brought by oneself and social distance will be taken care of.

Extended centers for examinations

The Union Ministry of Education has announced a list of state-wise centers for JEE and NEET examinations. In the list announced by the Ministry of Education, the number of centers for JEE examination has been increased from 570 to 660 while the number of centers for proper examination has been increased from 2846 to 3843.

The JEE also increased the number of shifts for the main exam

A circular issued by the Union Ministry of Education said that the JEE examination will be held from September 1 to 6 and the Nit examination will be held on September 13. The number of shifts for JEE main exams has also been increased. Earlier, eight shifts were fixed for this exam. Now they have increased to 12.

Admit cards for JEE main exams have also been released. Admit cards for the 2020 exam are also expected to be released this week. While releasing the admit card from NTA, it was stated that about 99 per cent students have been given the examination centers of their choice.

The National Testing Agency has clarified that JEE Mains and Neat Exam 2020 cannot be avoided. The exam will be held on September 13. However, there is still a demand to postpone the exam. But now the government has made it clear that under no circumstances can the exams be avoided. Students have already been notified by NTA about examination centers etc.

The Supreme Court has rejected a plea to postpone NEET and JEE exams in the wake of the corona virus epidemic. The epidemic of the corona virus is also beginning to take its toll. The court also ruled that the National Testing Agency's decision would not jeopardize the students' careers.

Neat and JEE tests have been postponed twice on the background of corona virus. Earlier, the exams were scheduled for May. The exam was to be held in July. However, as the spread of corona is increasing day by day, the examination for the month of July will be held in September. The JEE Main exam will now be held on September 1 to 6 and the Nit exam will be held on September 13.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda