मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष BA, B.Sc व BMS परीक्षेचा निकाल जाहीर

By Naukari Adda Team


मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष BA, B.Sc व BMS परीक्षेचा निकाल जाहीर, Results of 3rd year BA, B.Sc and BMS examinations of Mumbai University announced

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष/ सत्राच्या नियमित परीक्षेतील तृतीय वर्ष बीए, बीएस्सी व बीएमएस सत्र ६ या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आजपर्यंत विद्यापीठाने ८७ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.आज विद्यापीठाने १३ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.

तृतीय वर्ष बीए सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९४.७० टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ९ हजार ७८२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १३ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १३ हजार ५३७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. तर १०० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ५४७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.८५ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ८ हजार ०२५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १० हजार ५२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १० हजार ४४७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ७६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच १७६ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

 

तृतीय वर्ष बीएमएस सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.५८ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण १३ हजार १६६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १५ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ हजार ७०७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ४४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ३२७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षा विभागातील निकाल कक्ष व सीसीएफ मधील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग निकाल जाहीर करण्यासाठी कार्यरत आहेत.

निकाल – Http://Www.Mumresults.In/


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Results of 3rd year BA, B.Sc and BMS examinations of Mumbai University announced

By Naukari Adda Team


The results of the third year BA, BSc and BMS session 6 examinations of the final year / session of the final year / session of the academic year 2019-20 of Mumbai University have been announced. Till date, the university has announced the results of 87 exams. Today, the university has announced the results of 13 exams.

The result of the third year BA session 6 examination is 94.70 percent. A total of 9 thousand 782 students successfully passed this exam. 13 thousand 637 students had registered for this exam, out of which 13 thousand 537 students had entered the exam. 100 students were absent from the examination. Also, 547 students have failed the exam.

The result of the third year BSc Session 6 examination is 97.85 percent. A total of 8 thousand 025 students successfully passed this exam. 10 thousand 523 students had registered for this exam, out of which 10 thousand 447 students had entered the exam. 76 students were absent from the examination. Also, 176 students have failed the exam.

The result of the third year BMS session 6 examination is 97.58 percent. A total of 13 thousand 166 students successfully passed this exam. 15 thousand 751 students had registered for this exam, out of which 15 thousand 707 students had entered the exam. 44 students were absent from the examination. Also, 327 students have failed the exam.

All the officers and staff of the examination room and CCF of the examination department are working to announce the results.

Results - http://Www.Mumresults.In/


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda