महाविकास आघाडी सरकारची

By Naukari Adda Team


महाविकास आघाडी सरकारची , The Mahabharatis, the government leading the development, will fill 70 thousand vacant posts

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने विविध विभागातील तब्बल 70 हजार रिक्‍त पदांची महाभरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली असून सर्व विभागातील रिक्‍त पदांचा आढावा घेण्यात आला. ग्रामविकास, गृह, कृषी, पशु व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्‍त पदे असल्याने तातडीने महाभरती प्रक्रीया राबवावी अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी केली. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने 72 हजार रिक्‍त पदांच्या मेगाभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. पहिल्या टप्प्यात 36 हजार पदे भरण्यात येणार होती. मात्र, लोकसभा आचारसंहिता लागल्याने ही मेगाभरती प्रक्रिया थांबली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत रिक्‍तपदांबाबत चर्चा झाली. सर्वच विभागाच्या मंत्र्यांनी आपापल्या विभागातील रिक्‍त पदाबाबत चिंता व्यक्‍त केली. स्थानिक पातळीवर हजारो पदे रिक्‍त असल्याने प्रशासनावर प्रचंड भार असल्याने कामे रेंगाळत असल्याची खंत मंत्र्यांनी व्यक्‍त केली. ही रिक्‍त पदे तातडीने भरण्यासाठीचा कार्यक्रम सरकारने हाती घ्यायला हवा यावर सर्वच मंत्र्यांचे एकमत झाले. लवकरच या महाभरतीच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करून प्रक्रीया सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. त्यानुसार प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील वर्ग 1व 2 यांच्यासहीत तृतीय व चतुर्थ श्रेणीतील रिक्‍त पदांचा आढावा जाहीर करावा अशा सूचनाही देण्यात आल्या.

-: रिक्त जागांची स्थिती :-

ग्रामविकास विभाग: 11000
गृह विभाग: 7111
जलसंधारण; 2433
नगरविकास : 1500
आरोग्य : 10,560
कृषी विभाग : २५००
पदुम : 1047
सार्वजनिक बांधकाम : 8330
जलसंपदा : 8220


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The Mahabharatis, the government leading the development, will fill 70 thousand vacant posts

By Naukari Adda Team


MUMBAI: The Alliance for Development has decided to start the Mahabharata process of 70,000 vacant posts in various departments. This was discussed at a Cabinet meeting today and vacant posts of all departments were reviewed. All the Ministers demanded immediate implementation of Mahabharata process as the most vacant posts in rural development, housing, agriculture, animal and dairy farming, public works, water resources, water conservation, urban development and health departments. The then Devendra Fadnavis government announced a mega recruitment program of 72 thousand vacancies. In the first phase, 36 thousand posts were to be filled. However, due to the Lok Sabha code of conduct, this mega-recruitment process was halted. Cabinet meetings discussed vacancies. Ministers of all departments expressed concern about the vacant post in their department. The ministers expressed that thousands of posts are vacant at the local level as there is a huge burden on the administration. All the ministers agreed that the government should undertake the program to fill these vacant posts immediately. Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar directed the administration to start the process by drafting the Mahabharata program soon. Accordingly, it was advised that each department should declare a review of vacant posts in Class III and IV along with their Classes 1 and 2.

-: Vacancy Status: -

Rural Development Department: 11000
Home Department: 7111
Water storage; 2433
Urban Development: 1500
Health: 10,560
Department of Agriculture: 1
Padum: 1047
Public Works: 8330
Water Resources: 8220


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda