बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवस संप

By Naukari Adda Team


बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवस संप, Two days strike of bank employee

पुणे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बँक कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. परिणामी बँकांमधील कामे उरकण्यासाठी गुरुवारचा एकच दिवस मिळाला. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये वेतन पुनर्रचना, समान काम समान वेतन, पेन्शन आढावा, रिक्त जागांची भरती आदी मुद्द्यांचा समावेश आहे. यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी पूर्वीही लाक्षणिक संप पुकारला होता.

मात्र, त्याकडे दुर्लक्षच होत असल्याने बँक कर्मचारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइजकडून संपाची हाक देण्यात आली आहे. त्यात बहुसंख्य बँक कर्मचारी संघटनांचा समावेश असल्याने

 

संपाच्या काळात बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. दरम्यान, ३१ जानेवारी व एक फेब्रुवारी रोजी बँका बंद राहणार असल्याने नोकरदारांचा पगार उशिरा होण्याची शक्यता आहे. एक फेब्रुवारी रोजी

‘एटीएम’मध्ये पैशांची चणचण भासण्याची शक्यता आहे.

सौजन्य :म. टा.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Two days strike of bank employee

By Naukari Adda Team


Pune: The bank staff will be going back to work for your various pending demands. Due to this, the banking operations will be halted on Friday and Saturday. As a result, on Thursday, there was only one day to clear the banks. Various demands of bank employees across the country are pending. These include issues such as pay restructuring, equal work pay, pension reviews, filling up of vacancies. For this, the bank employees have called for a symbolic end.

However, because of its neglect, the United Forum of Bank Employees, the summit of the bank employees' unions, has called for an end. Since it comprises the majority of bank employees' associations


During the period of crisis, the functioning of banks will be halted. Meanwhile, the salaries of the employees are likely to be delayed as banks will be closed on January 1 and February 1. On a February

There is a possibility of money laundering at the ATMs.

Courtesy: M Ta


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda