मुंबई महानगर पालिकेची लिपिक भरती लांबणीवर

By Naukari Adda Team


मुंबई महानगर पालिकेची लिपिक भरती लांबणीवर, Mumbai Metropolitan City Clerk Recruitment

पालिकेच्या नोकर भरतीकडे आशेने डोळे लावून बसलेल्या इच्छुकांचा तूर्तास तरी हिरमोड होणार आहे. कार्यकारी सहायक पदाच्या अर्थात, लिपिकपदासाठी सरळसेवा पदांमधून होणाऱ्या ८१० पदांची भरती लांबणीवर पडली आहे. या भरतीसह पालिका कर्मचाऱ्यांमधून होणाऱ्या ८७४ जागांसाठीची अंतर्गत भरतीही रखडली आहे. आस्थापना खर्चात होत असलेली वाढ आणि पालिकेच्या उत्पन्नात झालेली घट यांमुळे ही भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पालिकेत कार्यकारी सहायक वर्गातील पाच हजार २५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३,२२१ पदे भरायची आहेत. त्यातील ८१० पदे सरळसेवा भरतीतून भरण्यात येणार आहेत. तर, कर्मचाऱ्यांमधून अर्थात अंतर्गत भरतीतून ८७४ पदे भरण्यात येणार होती. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाऊन त्याची लिंक महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार होती. भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मागील बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. पण, त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही. गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित होते. पण, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी एका निवेदनाद्वारे प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली. पालिकेच्या उत्पन्नात झालेली घट व आस्थापना खर्चात झालेली वाढ, यामुळे नोकर भरतीचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यास विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आक्षेप घेतला. ‘सल्लागारांवर कोट्यवधी रुपये उडवणारी महापालिका प्रशासन नोकर भरतीला विरोध का करत आहे? लिपिकांची कमतरता लक्षात घेता भरती झालीच पाहिजे’, असा आग्रह त्यांनी धरला. अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाचे निवेदन फेटाळत मूळ प्रस्तावावरील निर्णय पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवला आहे

पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८७४ पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ५०० रुपये शुल्क घेतले जाणार असून, मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. उद्या, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mumbai Metropolitan City Clerk Recruitment

By Naukari Adda Team


The aspirants who are looking forward to the recruitment of the municipal employees will be shocked. For the post of Executive Assistant, the posts for the post of Clerk are going to be filled up. With this recruitment, internal recruitment for the six posts from the municipal staff is also maintained. The administration has decided to postpone the recruitment process due to the increase in establishment costs and the decrease in municipal income.

There are five thousand 5 posts of an executive assistant in the municipality Out of those posts, it is straightforward to fill the posts with 1.5 posts. Five of those posts will be filled out of direct service recruitment. So, 6 posts would be filled from the internal recruits. To apply for the online application form, the application form would be uploaded on the website of MahaRikrument of Maha Online and its link would be made available on the website of the Municipal Corporation. The recruitment proposal was submitted for approval at the previous meeting of the Standing Committee. However, a decision could not be made at that time. The proposal was expected to be approved at Thursday's meeting. However, Additional Commissioner Vijay Singhal of the municipality demanded the withdrawal of the proposal in a statement. The administration said it was withdrawing its hiring proposal due to reduction in municipal income and increase in establishment expenses. Opposition leader Ravi Raja objected to this. 'Why is the Municipal Administration, which spends billions of rupees on consultants, oppose hiring? He added that recruitment must be taken into account when there is a shortage of clerks. Finally, the Standing Committee Chairman Yashwant Jadhav has rejected the municipal administration's decision and reserved the decision on the original proposal till the next meeting.

There are total of 8 posts of Executive Assistant in the Municipality. Of those posts, it is straightforward to fill 3 posts. Out of the direct service, the vacant posts will be filled. Therefore, there are expected to be a total of 3,000 applications in open and reserved category. For this exam, open class candidate will be charged Rs 2 each, while backward and other backward class candidates will be charged Rs 2 each. The application form will be uploaded on Maharonline's Maharicruitment website for all candidates to apply for online application. A link to this will be made available on the website of Mumbai Municipal Corporation. The company has selected Mahaonline Limited Company for recruitment, applying for online application for recruitment of posts, Computer Knowledge Test, Multipurpose Objective Online Examination, Online Professional Testing of English and Marathi Typography. The proposal has been submitted for the approval of the Standing Committee on Wednesday.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda