BSNL ग्राहक सेवा केंद्र आउटसोर्स

By Naukari Adda Team


BSNL ग्राहक सेवा केंद्र आउटसोर्स, BSNL Customer Service Center Outsource

BSNL ग्राहक सेवा केंद्र ‘आउटसोर्स’

भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) पुण्यात असलेली बहुतांश ग्राहक सेवा केंद्रे आता आउटसोर्स केली जाणार आहेत. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांऐवजी

खासगी कंपन्यांद्वारे कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून, हे कर्मचारी आता ग्राहकांना ‘बीएसएनएल’च्या सेवा पुरवणार असल्याची माहिती ‘बीएसएनएल’ प्रशासनाने दिली. ‘बीएसएनएल’साठी लागू केलेल्या ‘व्हीआरएस’ योजनेत पुण्यातील दोन हजार कर्मचाऱ्यांपैकी तेराशे कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने ‘बीएसएनएल’ने हे पाऊल उचलले आहे.

‘बीएसएनएल’ची शहरात अनेक ग्राहक सेवा केंद्र आहेत. बिल भरण्यापासून ग्राहकांना ‘बीएसएनएल’कडून विविध सेवा देण्यासाठी ही केंद्र कार्यरत असतात. मात्र, व्हीआरएस योजनेमुळे या केंद्रांमध्ये फारसे मनुष्यबळ नसल्याने ती ‘आउटसोर्स’ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती. ‘बीएसएनएल’च्या केंद्रीय मनुष्यबळ विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘बीएसएनएल’च्या पुणे विभागाचे व्यवस्थापक संदीप सावरकर या वेळी उपस्थित होते.

या ग्राहक सेवा केंद्रांमध्ये २५ टक्के कर्मचारी ‘बीएसएनएल’चे असतील, तर उर्वरीत कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरले जात आहेत, असेही वडनेरकर यांनी सांगितले. त्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेण्यात येत असून, या कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण दिल्यानंतर ते ग्राहक सेवा केंद्रांमध्ये कार्यरत होणार आहेत. सध्या ग्राहक सेवा केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने काही सेवा वेळेत पुरवण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीमुळे ते अडथळे दूर होऊन अधिक जलद पद्धतीने ग्राहकांना सुविधा मिळू शकतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुढील काही दिवसांमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जाणार असून, त्यानंतर ग्राहक सेवा केंद्रांवर देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासाठी व्हीआरएस योजनेनंतर ‘बीएसएनएल’कडे उरलेल्या सर्व स्टाफचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्राहक सेवा केंद्रांवर अधिकाधिक उच्चप्रशिक्षित कर्मचारी कार्यरत असतील, याची योग्य ती काळजी घेण्यात आल्याचे वडनेरकर यांनी स्पष्ट केले.

कंत्राटी कर्मचारी काम करणार?

वर्षानुवर्षे ‘बीएसएनएल’साठी काम करणारे कर्मचारी ‘बीएसएनएल’ला आपली कर्मभूमी मानून जलदगतीने काम करत होते. आता त्यांच्याजागी कंत्राटी कामगार येतील. त्यांच्याकडून योग्य ते काम होईल का, याबाबत साशंक असल्याचे कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून ‘बीएसएनएल’ची पत खालावली जाणार नाही, यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणीही संघटनांकडून करण्यात आली आहे.

‘बीएसएनएल’चे कर्मचारी केवळ सकाळी ९ ते ५ या वेळेते काम करू शकत होते. परंतु, आता एखादा कंत्राटी कामगार रात्री आठ वाजताही ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांची समस्या सोडवू शकतो. या नव्या दमाच्या कामगारांमुळे ‘बीएसएनएल’ची कार्यक्षमता वाढणार आहे. ग्राहकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा देऊन पुन्हा एकदा ‘बीएसएनएल’चा दबदबा निर्माण करण्याचा मानस आहे.

– अरविंद वडनेरकर, संचालक, केंद्रीय मनुष्यबळ विभाग, ‘बीएसएनएल’

 

सौर्स : मटा

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


BSNL Customer Service Center Outsource

By Naukari Adda Team


Most of the customer service centers of Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) in Pune will now be outsourced. The BSNL administration informed that it will now provide BSNL services to its customers, which will be recruited by private companies instead of BSNL employees. The BSNL has taken this step as the 'VRS' scheme implemented for BSNL, out of the two thousand employees in Pune, thirteen employees volunteered.

BSNL has many customer service centers in the city. These centers operate from BSNL to provide various services to the clients, from paying the bill. However, due to the VRS scheme there is not enough manpower in these centers, it has been decided to 'outsource' it. Arvind Wadnarkar, director of the BSNL's central human resources department, gave a press conference on Monday. Sandeep Savarkar, Manager, BSNL Pune, was present on the occasion.

While 5% of the employees in these customer service centers are BSNL, the remaining employees are being paid in a contractual manner, ”Vadnarkar said. The help of private companies is being taken up for this. After providing proper training to these employees, they will be working in customer care centers. At present, the number of employees in customer service centers is low due to some constraints in providing timely service. Recruitment of the contractual staff will help them overcome the obstacles and facilitate the customers in a faster way, the administration said.

Employees will be recruited in a contractual manner in the next few days, and then all facilities at customer service centers will be re-implemented. For this, after the VRS scheme, all the remaining staff of BSNL has been reviewed and re-staffed. Vadnarkar explained that proper care was taken to ensure that more and more highly trained staff were working in each customer service center.

Will the contract staff work?

For years, employees working for BSNL have been working fast, considering 'BSNL' as their workplace. Now the contract workers will come for them. Employees say they are doubtful whether they will do the right thing. The organizations have also demanded that the administration focus on ensuring that BSNL's credit is not degraded by the contract staff.

The employees of BSNL could only work from 8am to 5am. But now, a contract worker can go to a customer's house even after eight o'clock to solve their problems. BSNL's efficiency will be enhanced by these new asthma workers. BSNL intends to once again provide the best of its customers by providing good facilities.

- Arvind Wadnarkar, Director, Central Manpower Division, 'BSNL'

Source: Matta


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda