अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती

By Naukari Adda Team


अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती, Food Testing Laboratory Bharti 2020

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येणाऱ्या अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्त असलेल्या तांत्रिक पदांच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू आहे. समितीच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनाच्या आत पदभरती करण्यात  येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य प्रा. अनिल सोले यांनी नागपूर येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्त पदांविषयीची लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. शिंगणे बोलत होते. अन्न व औषध प्रशासनात विविध संवर्गात ११८३ पदे मंजूर आहेत.  यात अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळांतील एकूण १०३ तांत्रिक पदांचा समावेश आहे. या पदांसाठी उच्चस्तरीय  सचिव समितीची मान्यता  घेणे आवश्यक आहे. त्यानुसार समितीची मान्यता घेऊन पदभरती करण्यात येईल. अन्न चाचणी प्रयोगशाळा ही अन्न सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रयोगशाळा आहे. त्यामुळे या प्रयोगशाळांचे सक्षमीकरण करण्यात  येईल. सद्यस्थितीत नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद येथे अन्न चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. येत्या काळात नाशिक, पुणे येथेही अन्न चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात येईल, असे श्री. शिंगणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री रामदास आंबटकर, नागो गाणार, अंबादास दानवे, गिरीश व्यास यांनी भाग घेतला.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Food Testing Laboratory Bharti 2020

By Naukari Adda Team


MUMBAI: The approval of the high-level secretarial committee is underway in accordance with the technical terms vacant in the food testing laboratory under the Food and Drug Administration department. Minister of Food and Drug Administration Dr Rajendra Shingane said in the Legislative Council that the appointment will be made within the next session after the approval of the committee.

Member Pvt. Anil Sole had made a note about the vacancies in the Food Testing Laboratory at Nagpur. Responding to this attention, Shri. The horns were talking. In the Food and Drug Administration, 8 posts are approved in various categories. It includes a total of 4 technical positions in food and drug testing laboratories. These positions require the approval of a high-level secretary committee. Accordingly, the committee will be recruited with the approval of the committee. The Food Testing Laboratory is an important laboratory for food safety. Therefore, the laboratories will be empowered. Currently, food testing labs are working in Nagpur, Mumbai and Aurangabad. In the coming days, a food testing laboratory will also be set up in Nashik, Pune. Shingane said in the Legislative Council.

Shri Ramdas Ambtkar, Nago Ganar, Ambadas Danve and Girish Vyas participated in the discussion on the goals.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021