राज्यातल्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होणार ?

By Naukari Adda Team


राज्यातल्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होणार ?, maharashtra exam schedule will be change?

पुणे : जगभरात ‘कोरोना’ची दहशत पसरली असून आता भारतात देखील त्याने शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात पुण्यात विषाणूचा संसर्ग झाल्याचे काही रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे आणि मुंबईत करोनाची लागण झालेले रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय अवलंबण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मात्र सध्या परीक्षांचा मोसम सुरू असल्याने विद्यार्थी आणि विशेषत: पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.परीक्षा पुढे ढकलण्यात येतील असा अंदाज वर्तविला जात असताना राज्यातल्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होणार नसल्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

वर्षा गायकवाड यांनी टि्वट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. ‘राज्यात निश्चितच कोरोनाामुळे भीतीचे वातावरण आहे , पण तूर्तास शालेय परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा विचार नाही. आरोग्य विभागासोबत आज दुपारी बैठकीनंतर , शालेय शिक्षण विभाग, शाळा आणि काॅलेज याबाबत निर्णय घेण्यात येतील,’ असे ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

 

राज्यात निश्चितच कोरोनाामुळे भीतीचे वातावरण आहे , पण तूर्तास शालेय परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा विचार नाही. आरोग्य विभागासोबत आज दुपारी बैठकीनंतर , शालेय शिक्षण विभाग, शाळा आणि काॅलेज याबाबत निर्णय घेण्यात येतील . #Corona #Maharashtra #Schools

 #Exams

— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 11, 2020

 

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावानं बनावट पत्रक जारी करून कुणीतरी विद्यापीठाच्या अखत्यारीतील महाविद्यालयांना परस्पर सुट्टी जाहीर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना २० ते ३० मार्च दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे’ अशा आशयाचा संदेश असलेले निवेदन सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.

या प्रकाराची माहिती विद्यापीठ प्रशासनानं तात्काळ याबाबत खुलासा करून अफवेचं खंडन केलं आहे. ‘हा संदेश चुकीचा आहे. संबंधित निवेदन विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले नाही. ते कोणीतरी खोडसाळपणे तयार केले आहे. या प्रकारामुळे समाजात अफवा व घबराट पसरण्याचा धोका आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत विद्यापीठाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करणात येणार आहे, असा इशाराही विद्यापीठ प्रशासनानं दिला आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


maharashtra exam schedule will be change?

By Naukari Adda Team


Pune: The 'Corona' panic has spread across the world and now it has invaded India too. In Maharashtra, few people have been found to have been infected with the virus in Pune. To this end, the Collector has implemented 'Disaster Management Act' in Pune city and district. Therefore, it has been decided to acquire private hospitals, doctors and hospital equipments in case of catastrophic situation and if necessary.

The Maharashtra government has been alerted after finding coronary infected patients in Pune and Mumbai. Precautionary measures are being taken to prevent coronary infection. On the other hand, there is fear among students and especially parents as the exam season is currently underway.

Varsha Gaikwad tweeted about this and provided information. 'There is definitely a fear of coronation in the state, but Turtis is not planning to change the school exam schedule. After a meeting with the health department this afternoon, decisions will be taken on the school education department, the school and the college, ”tweeted Education Minister Varsha Gaikwad.

The state is certainly intimidated by the coronation, but Turt does not plan to change the school exam schedule. After a meeting with the health department this afternoon, decisions will be made regarding the school education department, school and college. #Corona #Maharashtra #Schools

#Exams

- Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 11, 2020

Meanwhile, Savitribai Phule has come up with the shocking form of issuing fake sheets in the name of Pune University to declare mutual holidays to the colleges of the university. A statement saying 'Savitribai Phule University has declared a holiday to colleges between March 3 and 8' in the wake of the spread of the Corona virus is currently circulating on social media.

The university administration has immediately denied the rumor by disclosing such information. 'This message is wrong. The relevant statement was not published by the University. Someone has created it badly. This type of society is in danger of spreading rumors and panic. Taking into consideration the seriousness of the matter, the University administration has warned that appropriate legal action will be taken by the University.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda