माकडाच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचला कोरोना व्हायरस; मात्र लस देताच झाला चमत्कार!

By Naukari Adda Team


माकडाच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचला कोरोना व्हायरस; मात्र लस देताच झाला चमत्कार!, corona vaccine-experiment-monkey-was-successful

माकडाच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचला कोरोना व्हायरस; मात्र लस देताच झाला चमत्कार!

 

बीजिंग : कोरोनाची लस शोधण्यात चीनला यश आल्याचे वृत्त आहे. चीनमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या ही माहितीनुसार या लसीची चाचणी माकडांवर करण्यात आली. माकडांमध्ये आधी कोरोनाचे विषाणू माकडांमध्ये सोडण्यात आले. तीन दिवसांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना ही लस देण्यात आली. या लसीमुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्तीत वाढल्याचे आढळून आले आहे.
माकडांमध्ये कोरोनाचे विषाणू सोडल्यानंतर सातव्या दिवशी एका माकडाच्या शरीरात ते पसरू लागले. त्याच्या फुफ्फुसापासून विविध भागांत हे विषाणू पसरले. मात्र, लस देण्यात आल्यानंतर प्रकृतीत सुधारणा दिसली असल्याचे प्रा. किन चुआन यांनी सांगितले. एक महिन्यानंतर काही माकडांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होऊन ते विषाणुमुक्त झाले. त्यांची चाचणीही निगेटिव्ह आली आणि शरीरातील सर्व अवयव नीट काम करीत असल्याचे आढळले.
प्रकृतीत सुधारणा झालेल्यापैकी दोन माकडांच्या शरीरात एका महिन्याने तोंडाद्वारे पुन्हा विषाणू सोडण्यात आले. त्यांना ताप आला, मात्र कोरोनाची अन्य कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. दोन आठवड्यांनी त्यांची आॅटोप्सी झाली. त्यातही विषाणूही आढळला नाही. त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा हा परिणाम होता, असे या दैनिकाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

आत्मविश्वास वाढला : कोरोनावरील लस अद्याप मानवांना देण्यात आली नसली तरी माकडांवर झालेला प्रयोग यशस्वी झाल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. संशोधनातील हे यश खूप महत्त्वाचे आहे, असे प्रा. चुआन यांनी म्हणाले. ही लस कोरोनाचा संसर्ग झालेल्या माणसांनासाठी उपयोगी पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिका, फ्रान्समध्येही संशोधन : अमेरिका, चीन व फ्रान्समधील शास्त्रज्ञ कोरोनावर उपचार शोधत असून, अमेरिकेत सोमवारी एका युवकाला लस टोचण्यात आली. तिथे एकूण ४५ युवकांवर हा प्रयोग करण्यात येणार आहे.

सोर्स - लोकमत 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


corona vaccine-experiment-monkey-was-successful

By Naukari Adda Team


Corona virus reaches mosquito's lungs; However, the miracle of vaccine was done!


BEIJING: China is reported to have succeeded in locating the Corona vaccine. According to a Chinese newspaper, the vaccine was tested on mosquitoes. Corona virus was previously released into the flies. The vaccine was given to them three days later after they noticed corona symptoms. The vaccine has been shown to increase their immune system.
On the seventh day after the release of the corona virus in the mosquitoes, it began to spread in the body of a monkey. The virus spread to various parts of his lungs. However, after the vaccine was given, there has been improvement in nature. Kin Chuan said. After a month some of the monkeys improved and became virus free. Their test was also negative and all the organs in the body were working well.
Two months after the improvement in nature, the body was released from the virus again by mouth for a month. They had a fever, but did not see any other symptoms of coronas. Two weeks later he had an autopsy. Neither virus was detected in it. This was the result of the immune system in their body, the daily said. (News agency)

Increased confidence: Although the vaccine on Corona has not been given to humans yet, the success of the experiment on monkeys has increased our confidence. This breakthrough in research is very important, Prof. Chuan said. He believes the vaccine will be beneficial for people infected with coronas.
Scientists from the US, China and France are seeking treatment for Corona, a young man was vaccinated in the United States on Monday. The experiment will be conducted on a total of 3 youths there.

Source - Lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda