Breaking News: एसटीमधील भरतीला स्थगिती!

By Naukari Adda Team


Breaking News: एसटीमधील भरतीला स्थगिती!, MSRTC Recruitment Update २०१९

सरळसेवा भरती २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदामध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने शुक्रवारी घेतला आहे. मात्र एसटी कर्मचारी संघटनेकडून या निर्णयाबाबत विरोध करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये एसटी महामंडळाची प्रवासी सेवा ठप्प आहे. त्यामुळे एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे. सामान्य जनजीवन सुरळीत होऊन एसटीची प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु होईपर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पूर्णपणे प्रवासी वाहतूक होत नसल्याने, वाहतुकीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी उपलब्ध आहेत.

MSRTC भरती साठी शैक्षणिक पात्रता काय असेल?

सरळसेवा भरती २०१९ अंतर्गत चालक आणि वाहक पदामध्ये रोजंदार गट क्रमांक १ मध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात यावी. भविष्यात कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार व चालविण्यात येणाऱ्या नियतानुसार आवश्यकता असल्यास त्यांना ज्येष्ठतेनुसार पुन्हा घेण्यात येईल.


सरळसेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहाय्यक, लिपिक- टंकलेखन, राज्यसंवर्ग व अधिकारी पदामध्ये व अनुकंपा तत्वावर उमेदवार प्रशिक्षण घेत असल्यास त्या उमेदवारांचे प्रशिक्षण शुक्रवारपासून तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात यावे. कार्यवाहीचा सविस्तर अहवाल शनिवारी सादर करण्यात यावा, असे परिपत्रक एसटी महामंडळाकडून काढण्यात आले आहे.

सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदाची भरती करताना एसटी महामंडळास आवश्यक असलेल्या जागेवर जाहिरात काढून भरती करण्यात आलेली तर, मग आता सेवा तात्पुरती खंडित कशासाठी करता ? सेवा खंडित करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने तत्काळ मागे घ्यावा.- मुकेश तीगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)

२०१९ पासून भरती झालेले चालक तथा वाहक या पदावरील कर्मचारी आपल्या पहिल्या नोकऱ्या सोडून एसटी महामंडळात रुजू झालेले आहेत. तेव्हा या निर्णयामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. अनुकंपा तत्वाची नोकरी हि एसटीचा कर्मचारी दिवंगत अथवा कायमचा जायबंदी झाल्यावर त्याच्या वारसाला ते कुटुंब जगवण्यासाठी ती नोकरी दिलेली असते. परंतु, त्याचेही प्रशिक्षण अथवा नोकरी थांबविणे, अत्यंत अन्यायकारक आहे.
– संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

एसटी महामंडळाकडून ८ हजार २२  भरती चालक तथा वाहक पदाची जाहिरात होती. यापैकी ४ हजार ५०० पात्र कर्मचार्यांना भरती करण्यात आले. यापैकी १ हजार ३०० कर्मचारी कामावर रुजू झाले होते. तर, ३ हजार २०० कर्मचारी प्रशिक्षक होते. त्यामुळे या सर्वानावर उपासमारीची वेळ येणार आहे, असे मत कर्मचारी संघटनेकडून व्यक्त करण्यात आले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MSRTC Recruitment Update २०१९

By Naukari Adda Team


The ST Corporation on Friday decided to temporarily suspend the services of employees appointed as drivers and carriers under Saralseva Recruitment 2019. However, the decision has been opposed by the ST workers' union.

The country has been locked down to prevent the spread of the corona virus. ST Corporation's passenger service is jammed during the lockdown period. So the financial math of ST has gone awry. It is likely to take a while for normalcy to return to normal and ST resumption of passenger transport. As there is no complete passenger transport at present, there are more staff available than required for transportation.

What will be the educational qualification for MSRTC recruitment?
Under Saralseva Recruitment 2019, the services of employees appointed in Rojandar Group No. 1 in the post of driver and carrier should be suspended temporarily. In the future, if there is a need according to the needs of the employees and the destiny to be run, they will be retaken according to their seniority.


If the candidates are undergoing training in the posts of Driver and Carrier, Assistant, Clerk-Typist, State Cadre and Officer and on compassionate basis, the training of those candidates should be temporarily postponed from Friday till further orders. A detailed report of the proceedings should be submitted on Saturday, a circular has been issued by the ST Corporation.

If the recruitment for the post of driver and carrier under the direct service recruitment year 2019 has been done by removing the advertisement in the place required by the ST Corporation, then why do you interrupt the service now? The decision to terminate the service should be withdrawn immediately as it is unjust. - Mukesh Tigote, General Secretary, Maharashtra ST Workers Congress (INTC)

The drivers and carriers recruited from 2019 have left their first jobs and joined ST Corporation. This decision will cause them to starve. A compassionate job is a job given to an ST employee to support his or her family in the event of death or permanent displacement. But, even stopping his training or job, is extremely unjust.
- Sandeep Shinde, President, Maharashtra State Transport Workers Union

There were advertisements for 8 thousand 22 recruited drivers and carriers from ST Corporation. Out of this 4,500 eligible employees were recruited. Out of this, 1,300 employees had started work. So, there were 3,200 staff coaches. Therefore, there will be a time of famine for all of them, said the workers' union.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda