आशा स्वयंसेविकांना 2 हजार तर गटप्रवर्तकांना तीन हजाराने वाढला मोबदला

By Naukari Adda Team


 आशा स्वयंसेविकांना 2 हजार तर गटप्रवर्तकांना तीन हजाराने वाढला मोबदला , aasha swayamsevika Bhatta Increment

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोना महामारी सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करणारा शासन निर्णय आज झाला आहे. मोबदल्यात वाढ करावी अशी मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने घेतली असून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना जुलैपासूनच वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार आहे.


 आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाकडून नियमित चार कामांसाठी प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल दोन हजार रुपयापर्यंत दरमहा वाढ करण्यास करण्यात आली आहे. तसेच गटप्रवर्तक यांना दरमहा तीन हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मोबदला वाढल्याने वर्षाला सरासरी 170 कोटी रुपये राज्यासाठी लागणार आहेत. या 170 कोटी रुपयांना ही मान्यता देण्यात आली आहे. 1 जुलैपासून या वाढीव मोबदल्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयं सेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला दिला जातो. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून नेमून दिलेल्या एकूण 78 सेवा केल्यास हा मोबदला मिळतो. अशा स्वंय सेविकांच्या मोबदल्यात वाढ करावी यासाठी विविध स्तरावर व विविध ठिकाणाहून मागणी होत होती.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


aasha swayamsevika Bhatta Increment

By Naukari Adda Team


A government decision has been taken today to increase the remuneration of Asha volunteers and group promoters who have been playing a key role in coping with the Corona epidemic for the last three to four months. There was a constant demand for an increase in compensation. The state government has taken note of this demand and Asha volunteers and group promoters will get the benefit of increased remuneration from July.


Asha Swayamsevaks have been asked to increase the remuneration received from the Central Government for four regular works up to a maximum of Rs. 2,000 per month. Also, the group promoters have been sanctioned to pay Rs 3,000 per month from the state government fund. The increase in compensation will cost the state an average of Rs 170 crore a year. This Rs 170 crore has been sanctioned. The increase will take effect on July 1.

Asha volunteers and group promoters are working in the state under the National Health Mission. Asha volunteers and group promoters are compensated from the grants sanctioned in the project implementation plan under the National Health Mission as per the instructions, criteria and rates of the Central Government. This is paid for a total of 78 services assigned by the National Health Mission. There was a demand at various levels and from different places to increase the remuneration of such volunteers.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda