आयआयटी प्रवेशासाठीची बारावीतील गुणांची अट यंदा रद्द

By Naukari Adda Team


आयआयटी  प्रवेशासाठीची बारावीतील गुणांची अट यंदा रद्द, Twelfth grade condition for IIT admission canceled this year

मुंबई  -  'आयआयटी'मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना यंदा त्यांना बारावीच्या परीक्षेत किती गुण मिळाले आहेत, याचा विचार केला जाणार नाही. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे देशातील काही शिक्षण मंडळांच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. तर काही मंडळांनी सरासरी गुण दिले आहेत. यामुळे देशातील सर्व 'आयआयटी'च्या संयुक्त परीक्षा मंडळाने यंदा प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

'आयआयटी'मधील प्रवेशांसाठी जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. जेईई मेन उत्तीर्ण झालेले दीड लाख विद्यार्थी अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतात. ही परीक्षा देणारे विद्यार्थी देशातील सर्व आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतात. असे असले तरी या विद्यार्थ्यांना मिळालेले बारावीचे गुण त्यासाठी ग्राह्य धरले जातात. 'आयआयटी'मध्ये प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डच्या गुणांबरोबरच बारावीत ७५ टक्के किंवा टॉप २० पर्सेंटाइल गुण आवश्यक असतात. यावर्षी ही अट शिथिल करण्यात आली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. मात्र विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. तसेच जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षाही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत नुकतीच देशातील मुंबईसह सर्व 'आयआयटी'च्या संचालकांची बैठक झाली. त्यानंतर संयुक्त परीक्षा मंडळाने याबाबतचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनीही ट्वीटद्वारे माहिती प्रसिद्ध केली आहे.

...यामुळेच निर्णय

सर्वसाधारणपणे 'आयआयटी' प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त बारावीत किमान ७५ टक्के गुण किंवा टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य असते. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीत किमान ६५ टक्के गुण आणि टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य आहे. मात्र यावर्षी करोनामुळे सीबीएसई, आयसीएसई बोर्डांनी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दोन्ही शिक्षण मंडळांनी निकाल लावताना अन्य परीक्षांच्या गुणांच्या आधारे मूल्यांकनाच्या विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणांवर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे संयुक्त परीक्षा मंडळाने बारावी गुण ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतला.

जेईई मेन लांबणीवर

करोनाच्या गंभीर स्थितीमुळे जेईई मेन परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. नव्या वेळापत्रकानुसार जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत तर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Twelfth grade condition for IIT admission canceled this year

By Naukari Adda Team


Mumbai: While admitting students to IITs, it will not be considered how many marks they have got in the Class XII examination this year. Some education boards in the country did not pass the exams due to the lockdown announced to prevent the spread of Corona. So some circles have given average marks. As a result, the Joint Examination Board of all IITs in the country has decided not to consider 12th standard marks for admission this year.

For admission in IITs, it is necessary to pass JEE Main, JEE Advanced. One and a half lakh students who have passed JEE Main are eligible for the Advanced Examination. Students appearing for this exam are eligible for admission in all IITs and NITs in the country. However, the marks obtained by these students are considered valid. For admission in IITs, these students need 75% marks in 12th along with JEE Advanced marks or Top 20th percentile marks. This year the condition has been relaxed. This means that students' marks in Class XII will not be considered. However, the student will have to pass the matriculation examination. Must also pass JEE Advanced Exam. A meeting of the directors of all IITs in the country, including Mumbai, was held recently. After that, the Joint Examination Board took a decision in this regard and gave relief to the students. The Union Minister for Human Resource Development has also released information about this through a tweet.

... that's why the decision

Generally, for 'IIT' admission, one has to pass the JEE Advanced exam. In addition, at least 75% marks or top 20th percentile is mandatory in 12th standard. Students in the reserved category are required to have at least 65% marks in 12th standard and top 20th percentile. However, this year, CBSE and ICSE boards have canceled Class X and XII examinations due to Corona. Both the Boards of Education have adopted specific methods of assessment based on the results of other examinations. As a result, it can affect students' grades. As a result, the Joint Examination Board decided not to accept the 12th mark.

JEE Main on extension
The JEE Main exam was postponed twice due to Corona's critical condition. According to the new schedule, the JEE Main exam will be held from September 1 to 6 and the JEE Advanced exam will be held on September 27.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda