धक्कादायक! परीक्षेला बसलेले 3 विद्यार्थी निघाले पॉझिटिव्ह, 600 पालकांविरुद्ध गुन्हा दाखल

By Naukari Adda Team


धक्कादायक! परीक्षेला बसलेले 3 विद्यार्थी निघाले पॉझिटिव्ह, 600 पालकांविरुद्ध गुन्हा दाखल, Shocking! 3 students who sat for the exam came out positive, filing a case against 600 parents

धक्कादायक! परीक्षेला बसलेले 3 विद्यार्थी निघाले पॉझिटिव्ह, 600 पालकांविरुद्ध गुन्हा दाखल

केरळ, 23 जुलै : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे अजूनही काही विद्यापीठं मुलांच्या परीक्षा घेत आहेत. मेडिकल, अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहेत. अशीच एक प्रवेश परीक्षा केरळमधील इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकलने (KEAM) आयोजित केली होती. मात्र या परीक्षेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम मोडण्यात आले. परिणामी परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि पालक असे एकूण 6 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी तब्बल 600 पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी या परीक्षेला बसलेले दोन विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आले होते, त्यानंतर आणखी एक विद्यार्थी आणि उपस्थित पालकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, या प्रकारानंतर केरळ सरकारने KEAMवर कारवाई करण्याचे ठरवल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर पालकांनी केलेल्या गर्दीचा फोटो व्हायरल झाला. या फोटोवरून या परीक्षेस उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या 600 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही परीक्षा 16 जुलै रोजी घेण्यात आली होती. दरम्यान परीक्षा केंद्राबाहेर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवण्यात आल्याचे दिसून आले. व्हायरल झालेल्या फोटोवरून पालकांविरुद्ध कलम 269 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे पोलीस सध्या या प्रकरणातील व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ तपासून लोकांची ओळख पटवत आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या केरळ सरकारने परीक्षेला परवानगी दिलीच कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातही अंतिम वर्षांच्या परीक्षेवरून वादंग सुरू आहे. एकीकडे सरकार परीक्षा रद्द करण्याच्या तयारीत आहे मात्र विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) परीक्षा घेण्याची सक्ती करत आहे. त्यामुळे केरळमधील हे प्रकरणं समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Shocking! 3 students who sat for the exam came out positive, filing a case against 600 parents

By Naukari Adda Team


Shocking! 3 students who sat for the exam came out positive, filing a case against 600 parents

Kerala, July 23: While the number of coroners in the country is increasing day by day, on the other hand, some universities are still conducting examinations for children. Medical, engineering and architecture exams are proving to be dangerous for students. A similar entrance test was conducted by Engineering Architecture Medical (KEAM) in Kerala. However, all the rules of social distance were broken during this exam. As a result, a total of 6 students and parents who sat for the exam were found to be corona positive. A case has been registered against 600 parents in this regard.

Earlier, two students who sat for the test were found to be positive, followed by another student and the parents who were present. Meanwhile, a photo of a crowd of parents outside the examination center went viral after the Kerala government decided to take action on KEAM after the incident. A case has been registered against 600 parents of students who appeared for the exam from this photo.

The exam was held on July 16. Meanwhile, outside the examination center, it was seen that the rules of social distance were blown up. An offense under Section 269 has been filed against the parents over the viral photo. Police, on the other hand, are currently identifying people by checking the viral photos and videos in the case. On the other hand, how did the Kerala government allow the number of corona patients in the state to be tested? Such a question has arisen. Maharashtra, on the other hand, is also embroiled in controversy over its final year exams. On the one hand, the government is preparing to cancel the exam but the University Grants Commission (UGC) is forcing the exam. Therefore, after these cases came to light in Kerala, the concern of students and parents in Maharashtra has increased.

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda