नाशिक ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरु

By Naukari Adda Team


नाशिक ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरु, Nashik 11th admission process started

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे, कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबले असून, त्यामुळे पुढील प्रभावीत झालेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. शहरातील  ५९ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार ९६० जागा उपलब्ध आहे. या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून  ही प्रक्रिया पूर्ण होताच विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, गतवर्षी नाशिकमध्ये २३ हजार ९६ जागांपैकी केवळ १९ हजार २३८ जागांवरच प्रवेश होऊ शकले होते. तर जवळपास ४ हजार ७२२ जागां रिक्त राहिल्या होत्या.

काज रुळावर आणण्यासाठी अकरावी प्रवेशप्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. त्यापूर्वी १५ जुलैपर्यंत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. संबंधित मुख्याध्यापक तथा प्राचार्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, १६ जुलैपर्यंत नोंदणीकृत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती तपासून अंतिम करण्यात येणार आहे, तर विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने १५ जुलैपासून दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे व माहिती मान्यतेसाठी शाळा अथवा मार्गदर्शन केंद्राची निवड करणे, अर्जाला मान्यता मिळल्याची खात्री करणे आदी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

निकालानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार असून, त्यात महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवून संकेतस्थळावर अंतिम अर्ज सादर करता येणार आहे. दरम्यान, यावर्षी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेर होणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  दरम्यान, गतवर्षी एकीककडे शहरातील विविध शाळां-महाविद्यालयांमध्ये  ४ हजार ७२२  जागा रिक्त राहिल्या होत्या. तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वारंवार फेºयांमध्ये सहभाग घ्यावाला लागला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालये निवडताना संभ्रमित न राहाता प्रवेश कोणत्या महाविद्यालयात घ्यायचा याचा निर्णय घेऊनच पर्याय निवडण्याची गरज आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Nashik 11th admission process started

By Naukari Adda Team


Friends, as you know, Corona has delayed the results of Class X and XII examinations, so the admission process for Class XI has finally started. There are about 23 thousand 960 seats available in 59 higher secondary schools and junior colleges in the city. The process of registering the change in the admission capacity has started and as soon as the process is completed, the students will have the opportunity to fill part one of the online application from July 15. Meanwhile, out of 23 thousand 96 seats in Nashik last year, only 19 thousand 238 seats could be admitted. About 4 thousand 722 seats were vacant.

A possible timetable for the eleventh admission process has been announced to bring Kaj on track. The results are expected to be announced by the end of July. On that background, students will be able to fill the first part of the online application from July 15 for the eleventh admission. Prior to that, online registration of higher secondary schools and junior colleges will be done on the website till July 15. This responsibility has been entrusted to the concerned headmasters and principals. The information of registered higher secondary schools and junior colleges will be checked and finalized by 16th July. The process will be completed to ensure that the application is approved.

After the results, the students will be able to fill up part two of the application, in which the final application will be submitted on the website by registering the preference of the colleges. Meanwhile, the Office of the Deputy Director of Education has clarified that this year, the first-come, first-served basis will not be the first priority. Meanwhile, last year, 4,722 seats were vacant in various schools and colleges in the city. On the other hand, many students had to participate in frequent fairs for admission. Therefore, students need to decide which college to take admission in without being confused while choosing colleges.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda