एचसीएल टेक्नॉलॉजी करणार ९ हजार फ्रेशर्सची मेगाभरती

By Naukari Adda Team


एचसीएल टेक्नॉलॉजी करणार ९ हजार  फ्रेशर्सची मेगाभरती, HCL Mega Recruitment 2020

HCL Mega Recruitment 2020

कोरोना विषाणू्च्या फैलावामुळे सध्या गंभीर संकट उभे राहिलेले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगसारखे निर्बंध वारंवार लागू करावे लागत असल्याने त्याचा विपरित परिणाम उद्योगधंदे आणि अर्थविश्वावर होत आहे. व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने अनेक व्यवस्थापनांमध्ये पगारकपात, कर्मचारी कपात केली जात आहे. अशा परिस्थितीत नव्या रोजगार निर्मितीची शक्यता कमी झालेली असताना नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीने नव्या कर्मचाऱ्यांच्या मेगा भरतीची घोषणा केली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये नव्या १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कॉलेज कॅम्पस मुलाखतींच्या माध्यमातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात ही भरती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून ९ हजार पदांची भरती केली होती.

याबाबत कंपनीचे एचआर हे अप्पाराव व्हीव्ही यांनी सांगितले की, ही भरती दोन प्रमुख पातळ्यांवर होणार आहे. यामध्ये ग्रोथ आणि रिक्त पदे भरली जातील. गेल्या आणि चालू तिमाहीमध्ये कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे एट्र्रिशन रेट खूप कमी झालाआहे. या तिमाहीमध्ये एट्रिशन रेट हा सिंगल डिजिटच्या आत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅक फिल हायरिंग कमी राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोविड-१९ मुळे कॅम्पस हायरिंगमध्ये काही अडथळे येऊ शकतात. कारण कॅम्पस अद्याप सुरू झालेले नाहीत. तसेच विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही झालेल्या नाहीत. दरम्यान, कंपनी पूर्णपणे व्हर्च्युअल माध्यमातून भरती करणार आहे. जूनमध्ये कंपनीने १ हजार कॅम्पस रिक्रुटमेंट केल्या आहेत. तसेच कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठीचा सरासरी पगार ३.५ लाखांपर्यंत आहे.

दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत असले तरी जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीच्या उत्पादनक्षमतेत वाढ झाली आहे. कंपनीचे सुमारे ९६ टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत. तर २ टक्के कर्मचारी त्यांची केंद्रे आणि उर्वरित २ टक्के कर्मचारी ग्राहकांकडे जाऊन काम करत आहेत, असेही अप्पाराव यांनी सांगितले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


HCL Mega Recruitment 2020

By Naukari Adda Team


The spread of the corona virus is currently causing a serious crisis. Restrictions such as lockdowns and social discrimination have to be enforced frequently to prevent the spread of the corona, which is having an adverse effect on businesses and the economy. Salary cuts and staff cuts are being made in many managements as transactions have stalled. In such a scenario, while the chances of creating new jobs are less, there is a golden opportunity for those looking for a new job.

HCL Technology has announced a mega recruitment of new employees. HCL Technology will be recruiting 15,000 new employees. The recruitment will be done in the financial year 2020-21 through college campus interviews. Last year, the company had recruited 9,000 posts through campus interviews.

Apparao VV, the company's HR, said the recruitment would take place at two major levels. This will include growth and vacancies. The number of employees leaving the company has decreased in the last and current quarters. So the attrition rate has come down a lot. The attrition rate is expected to fall to single digits this quarter. Therefore, back fill hiring is likely to be less.

Meanwhile, Covid-19 may cause some disruption to campus hiring. Because the campuses have not started yet. Also, the final year examinations of the students have not been held. Meanwhile, the company is going to recruit entirely through virtual. The company has recruited 1,000 campuses in June. Also, the average salary for freshers in the company is up to Rs 3.5 lakh.

Meanwhile, the company’s productivity has increased in the June quarter, despite employees working from home due to corona and lockdown regulations. About 96% of the company's employees work from home. Apparao said that 2 per cent of the employees are going to their centers and the remaining 2 per cent are going to the customers.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda