permanent commission: लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन; केंद्राची मंजुरी

By Naukari Adda Team


permanent commission: लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन; केंद्राची मंजुरी, permanent commission: permanent commission for women officers in the army; Centre

नवी दिल्ली: भारतीय लष्करातील महिलांच्या कायमस्वरूपी कमिशनला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. या संदर्भात केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली. त्यानंतर ता लष्करातील वरच्या विविध स्तरांवर महिलांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (center approves permanent commission for women officers in indian army)

या आदेशानुसार, शॉर्ट सर्व्हीस कमिशनच्या (SSC) महिला आधिकाऱ्यांना भारतीय लष्कारातील सर्व १० विभागांमध्ये कायमस्वरूपी परवानगी मिळाली आहे.

याचाच अर्थ, आता लष्कर, हवाईदल, सिग्नल, इंजीनियर, आर्मी एव्हिएशन, इलेक्ट्रॉनिक्सस मेकॅनिक इंजीनियरिंग, आर्मी सर्व्हीस कॉर्प्स, आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स आणि इंटेलिजन्स कॉर्प्समध्ये देखील कायमस्वरुपी कमिशन मिळणार आहे.

या आदेशानंतर आता लवकरच पर्मनंट कमिशन निवड मंडळाकडून महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. या साठी लष्कर मुख्यालयाने इतर अनेक पावले उचलले आहेत. आता निवड मंडळ सर्व एसएससी महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

भारतीय लष्कर पूर्णपणे महिला अधिकाऱ्यांना देशाची सेवा करण्याची संधी देण्यासाठी तयार असल्याचे भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कायमस्वरूपी कमिशनची दीर्घकाळापासून मागणी होत होती.सुप्रीम कोर्टात देखील या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले होते. महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन तयार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. सुप्रीम कोर्टाने गेल्या फेब्रुवारी महिन्यात महिला अधिकाऱ्यांसाठीच्या कायमस्वरूपी कमिशनबाबतचा ऐतिहासिक निकाल दिला होता. देशातील सर्व नागरिकांना संधीची समानता, लैंगिक न्याय यानुसार भारतीय लष्करातील महिलांच्या भागिगारीची दिशा निश्चित करेल, असे सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना म्हटले होते.

भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे. अशा देशाच्या लष्करात महिलांचा वाटा ३.८ टक्के इतका आहे. हवाई दलात मात्र, महिलांता १३ टक्के इतका वाटा आहे. तर नौदलात ६ टक्के इतका वाटा आहे. भारतीय लष्करात पुरुष अधिकाऱ्यांची संख्या ही ४० हजारांच्या वर आहे. तर महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण हे दीड हजार इतकेच आहे.
 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


permanent commission: permanent commission for women officers in the army; Centre's approval

By Naukari Adda Team


New Delhi: The Union Ministry of Defense has officially approved the permanent commission of women in the Indian Army. The Central Government issued a notification in this regard. Since then, the way has been paved for the recruitment of women at various levels at the top of the army. (center approves permanent commission for women officers in indian army)

According to the order, women officers of the Short Service Commission (SSC) have been granted permanent permission in all 10 divisions of the Indian Army.

This means that there will now be permanent commissions in the Army, Air Force, Signals, Engineers, Army Aviation, Electronics Mechanical Engineering, Army Service Corps, Army Ordinance Corps and Intelligence Corps.

Following this order, women officers will be appointed by the Permanent Commission Selection Board soon. The Army Headquarters has taken several other steps for this. Now the selection board will start the process of getting the documents from all the SSC women.

The Indian Army is fully prepared to give women officers the opportunity to serve the country, the statement said. A permanent commission was demanded for a long time. The matter was also heard in the Supreme Court. At the time, the Supreme Court had slammed the central government. The apex court had given the Center three months to form a permanent commission for women officers. The Supreme Court last February handed down a landmark ruling on a permanent commission for women officers. The Supreme Court had said in its judgment that equality of opportunity for all citizens of the country, gender justice would determine the direction of participation of women in the Indian Army.

India has the second largest army in the world. The share of women in the army of such a country is 3.8 per cent. In the Air Force, however, women account for 13 per cent. The navy has a 6 per cent share. The number of male officers in the Indian Army is over 40,000. The number of women officers is only one and a half thousand.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda