2 वेळा नापास झाल्यानं लोकांनी सुनावलं, तिसऱ्या प्रयत्नान कसं मिळवलं UPSCमध्ये यश

By Naukari Adda Team


2 वेळा नापास झाल्यानं लोकांनी सुनावलं, तिसऱ्या प्रयत्नान कसं मिळवलं UPSCमध्ये यश, After failing 2 times, people told how the third attempt was successful in UPSC

हैदराबाद, 26 जुलै: मुलीचा जन्म म्हणजे चूल आणि मूल किंवा ओझं असं समजलं जाणाऱ्या कुटुंबात आणि समाजात सगळ्यांचा विरोध पत्करून मेहनतीनं IAS होण्याचं स्वप्न तरुणीनं साकार केलं. हैदराबादची रहिवासी जमील फातिमा जेबा हिने UPSC 62 वा क्रमांक मिळविला आहे. हे यश मिळविण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सामान्य मुलींप्रमाणेच, जेबालासुद्धा घरातील लोकांकडून आणि समाजाकडून विरोध सहन करावा लागला. अशा परिस्थितीत तिने ही परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत हार मानणार नाही असा निर्णय घेतला होता.

सेंट फ्रान्सिस महाविद्यालयातून एमबीए पूर्ण केल्यानंतर झेबाने यूपीएससीची तयारी करण्याचा विचार केला. यासाठी त्यांनी कोचिंग क्लासचीही मदत घेतली.

पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना जेव्हा अपयश आलं तेव्हा नातेवाईक आणि मित्र-मैत्रीणी आजूबाजूच्या लोकांनी घरच्यांना लग्न करून देण्याबाबत सांगितलं. माझ्याकडून काही होणार नाही त्यामुळे लग्न करावं असे टोमणे प्रत्येकानं ऐकवले. माझ्या प्रत्येक कठीण परिस्थितीच्या काळात एक मात्र होतं. आई-वडिलांनी माझी खूप मोठी साथ दिली.

'इतका सगळा ताण असतानाही मी माझ्या निश्चयावर ठाम होते. हे मी करू शकते असं पुन्हा पुन्हा मनाला बजावत होते. माझ्या निर्णयावर आणि मनावर माझा पूर्ण विश्वास होता. हाच यशाचा खरा मूलमंत्र असतो, आपण आपल्या मनाशी ठाम आणि सकारात्मक असायला हवं. तिसऱ्या प्रयत्नात मला यश मिळालं. 2018 च्या UPSC परीक्षेत 62 वा क्रमांक मिळाला आणि स्वप्न साकार झाल्याचा आनंद खूप मोठा होता', अशी भावना जमील फातिमा जेबाने व्यक्त केली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


After failing 2 times, people told how the third attempt was successful in UPSC

By Naukari Adda Team


Hyderabad, July 26: The birth of a girl child is considered as a burden and a child or a burden in the family and society against the opposition of the young woman realized the dream of becoming an IAS. Jamil Fatima Jeba, a resident of Hyderabad, is ranked 62nd in UPSC. She had to face many difficulties to achieve this. Like normal girls, Jebala had to endure opposition from family and the community. In such a situation, she had decided not to give up until she passed the exam.

After completing his MBA from St. Francis College, Zeba considered preparing for UPSC. For this, he also took the help of coaching class.

When they failed in the first two attempts, relatives and friends around them told the family to get married. Everyone heard the joke that I should get married because nothing will happen to me. There was only one in each of my difficult situations. My parents were very supportive.

'In spite of all the stress, I was firm in my resolve. It was playing on my mind again and again that I could do it. I had complete faith in my decision and mind. This is the true mantra of success, we have to be firm and positive with our mind. I succeeded in the third attempt. I got the 62nd position in the UPSC exam of 2018 and I was very happy that my dream came true ', said Jameel Fatima Jeba.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda