यावर्षी डिप्लोमा ऍडमिशनमध्ये महत्वाचा बदल

By Naukari Adda Team


यावर्षी डिप्लोमा ऍडमिशनमध्ये महत्वाचा बदल  , Significant change in diploma admission this year

दहावी आणि बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाची यंदा एक प्रवेश फेरी कमी करण्यात आली असून दोनच नियमित फेऱ्या होणार आहेत. तर, केवळ महाराष्ट्रात इयत्ता १० वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार आहे. याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाने नवीन आदेश जाहीर केले आहेत.

दहावीनंतर पाॅलिटेक्नीकला प्रवेश घेता येतो, तर इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या शाखांच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठीही प्रवेश देण्यात येतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आणि प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाने अद्याप जाहीर केले नसले प्रवेशासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

या अभ्यासक्रमासाठी इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी हे शिक्षण महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थेत होणे आवश्यक होते. पण आता बदललेल्या नियमानुसार ८वी, ९वी इतर राज्यात केले तरी १०वी महाराष्ट्रात झाली असेल, तर या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे.

दरवर्षी या सर्व अभ्यासक्रमाच्या तीन फेऱ्या होतात, पण यंदा दोनच प्रवेश फेऱ्या घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तिसरी प्रवेश फेरी रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेचा कालावधी कमी होणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयांनाही दोन प्रवेश फेऱ्यांचा आदेश लागू होणार आहे.

जे विद्यार्थी अर्ज भरू न शकलेले, प्रवेश न मिळालेले, न घेतलेले अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे. दोन प्रवेश फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येतील. त्यात राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतरही जागा रिक्त राहिल्यास इतर राज्यातील विद्यार्थी आणि परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील.

आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयानुसार यंदा या अभ्यासक्रमांसाठी मराठा प्रवर्गासाठी १६ ऐवजी १२ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. यंदा अभ्यासक्रम किंवा संस्था बंद करण्यासाठी अर्ज केलेल्या संस्थांना यंदा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

१) नियमात बदल केल्याने प्रवेश वाढण्याची शक्यता
२) डिफेन्सच्या कोट्यासाठी ५ जागांऐवजी ५ टक्के जागा आरक्षित
३) कागदपत्र तपासणीसाठी स्वतंत्र आदेश काढले जाणार
४) महाराष्ट्रात ८वी, ९वी उत्तीर्ण न होता, थेट १०वीत प्रवेश घेणाऱ्यांना दिलासा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Significant change in diploma admission this year

By Naukari Adda Team


This year, the admission round for the postgraduate and postgraduate technical education diploma courses has been reduced to one regular round. So, only in Maharashtra, students who pass 10th standard will also get admission. The Directorate of Technical Education has issued new orders in this regard.

Polytechnic can be admitted after Class X, while Diploma Courses in Engineering, Pharmacology, Hotel Management and Catering Technology can be admitted after Class XII. Admission is also given for the second year diploma course. The Directorate of Technical Education has not yet announced the schedule and process of admission process for these courses but has announced new rules for admission.

For this course, 8th, 9th and 10th standard education had to be done in a recognized institute in Maharashtra. But now as per the changed rules, if 8th, 9th is done in other states but 10th is done in Maharashtra, then these courses will get admission.

There are three rounds of all these courses every year, but this year only two rounds will be held. The third entry round has been canceled. This will reduce the duration of the admission process. The order of two admission rounds will also be applicable to minority colleges.

A special round will be held for all the students who could not fill the application, did not get admission, did not take it. Vacancies will be filled after two rounds of admission. Preference will be given to students from the state. If the seats remain vacant even after that, students from other states and foreign students can be admitted.

As per the decision taken regarding reservation, 12 per cent seats will be reserved for the Maratha category instead of 16 per cent for these courses this year. Institutions that have applied to close courses or institutes this year will not be able to participate in the admission process this year, the order said.

Key points:

1) Possibility of increasing admission due to change in rules
2) 5% seats reserved for defense quota instead of 5 seats
3) A separate order will be issued for document inspection
4) Consolation to those who did not pass 8th or 9th in Maharashtra, but directly to 10th


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda