विद्यार्थ्यांसाठी लवकरच MPSC मार्फत मोबाईल App

By Naukari Adda Team


विद्यार्थ्यांसाठी लवकरच MPSC मार्फत मोबाईल App , Mobile App soon for students through MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा(एमपीएससी) कारभार सुधारावा, गतिमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असत असतात. त्यात दृष्टीने ‘एमपीएससी’ एक पाऊल पुढे टाकून ;उमेदवारांच्या सोईसाठी अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात. पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे ग्रामीण भागातील विद्यार्थी ‘एमपीएससी’च्या अभ्यासासाठी क्लास लावतात. पुण्यात तर या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून, दरवर्षी सुमारे ४० ते ५० हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरत असतात. तर महाराष्ट्रभरातून किमान ३ ते ४ लाख विद्यार्थी विविध परीक्षां देतात.

‘एमपीएससी’चा अभ्यास करताना आयोगाकडून येणाऱ्या सूचना, बदललेले नियम, परीक्षांचे वेळपत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक, परीक्षा अर्ज भरणे, हाॅल तिकीट, परीक्षेचा निकाल, त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळासाठी अवलंबून रहावे लागते. मोबाईलवर संकेतस्थळाला भेट देऊन सर्व गोष्टी तपासणे गैरसोयीचे ठरत आहे. परीक्षा अर्ज मोबाईलवर भरणे अवघड जाते, त्यामुळे लॅपटॉपची व्यवस्था करावी लागते किंवा इंटरनेट कॅफेवर जावे लागते.

उमेदवारांची गैरसोय लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने अ‍ॅप विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. पुढील काही महिन्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईल मध्ये हे अ‍ॅप असणार आहे.

काय असणार अ‍ॅपमध्ये

१) अ‍ॅपमध्ये ‘एमपीएससी’च्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळून सर्व गोष्टी ऑनलाईन करता येणार आहेत.

२) दरवर्षी आयोगातर्फे दरवर्षी किती परीक्षा घेण्यात येतात, किती जिल्ह्यात किती ;सेंटर असतात, तेथे वर्ग खोल्या किती असतात, एका वर्गात किती उमेदवार परीक्षा देतात यापासून ते परीक्षा अर्ज भरण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात, प्रत्येक परीक्षेसची पात्रतेची नियमावली, निकाल लागल्यानंतरची प्रक्रिया याचाही विचार करण्यात आला आहे.

३) हे अ‍ॅप खासगी कंपनीकडून तयार करून घेतले जात असले तरी याची मालकी ‘एमपीएससी’कडे असणार आहे. तसेच उमेदवारांची वैयक्तिक माहिती, अ‍ॅपची सायबर सुरक्षा याला ही महत्व देण्यात आले आहे. याही निविदेतील नियम व अटींमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे.

दिव्यांग फ्रेंडली अ‍ॅप

राज्य शासनाच्या पदभरतीमध्ये दिव्यांगांसाठी पदे आरक्षीत असतात. त्यांना ही हे अ‍ॅप वापरणे सोपे जावे याचा विचार केला आहे. तसेच चाट विंडो, परीक्षा केंद्राचे लोकेशन, फिडबॅक, थम इंप्रेशन सह लेखी स्पष्टीकरण, तसेच वेगवेगळ्या अँगलमधून लाईव्ह फोटो काढण्याची व्यवस्था या अ‍ॅपमध्ये असणार आहे

एवढ्या जिल्ह्यात होते परीक्षा

१) वर्षभरात होणाऱ्या परीक्षा – १०

२) राज्यभरातील परीक्षा केंद्र – १२००

३) एका जिल्ह्यात परीक्षा केंद्र – १ ते १५०

४) राज्यभरात लागणारऱ्या वर्गखोल्या – १५०००

५) एका जिल्ह्यात जास्तीत जास्त लागणाऱ्या;खोल्या – १९००

६) एका परीक्षा केंद्रावरचे कमाला विद्यार्थी – ५०४

७) एका खोलीत कमाला विद्यार्थी – २४

८) परीक्षेचे दिवस – १ ते ३


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mobile App soon for students through MPSC

By Naukari Adda Team


The students were expressing the expectation that the functioning of the Maharashtra Public Service Commission (MPSC) should be improved and speeded up. With this in mind, MPSC has taken a step forward and decided to create an app for the convenience of the candidates.

 

In order to get a job in the state government after graduation, graduates in the state look for competitive examinations. In Pune, Mumbai, Aurangabad, students from rural areas take classes to study for MPSC. Pune has the highest number of these students and around 40,000 to 50,000 students apply for the exams every year. At least 3 to 4 lakh students from all over Maharashtra take various exams.

While studying for MPSC, one has to rely on the website for instructions from the Commission, changed rules, examination schedule and circulars in that regard, filling up of examination forms, hall tickets, results of examinations, all subsequent procedures. It is becoming inconvenient to check everything by visiting the website on mobile. It is difficult to fill up the exam form on mobile, so you have to arrange a laptop or go to an internet cafe.

 

Considering the inconvenience of the candidates, the Maharashtra Public Service Commission has decided to develop the app. A tender has been invited for this. In the next few months, this app will be in the mobile of every student studying for the competitive exam.

What will be in the app
1) Everything in the work of ‘MPSC’ has been considered in the app. In this, everything can be done online without any human interference for the sake of transparency.

2) How many examinations are conducted by the Commission every year, how many districts, how many centers there are, how many classrooms there are, how many candidates are appearing in a class, what documents are required to fill the examination form, eligibility rules of each examination, process after results are also considered. Is.

3) Although this app is being developed by a private company, it will be owned by MPSC. Also important is the personal information of the candidates, the cyber security of the app. This is clearly stated in the terms and conditions of the tender.

 

Divyang Friendly App
Posts are reserved for the disabled in state government recruitment. They want to make it easier for them to use this app. The app will also have chat window, location of examination center, feedback, written explanation with first impression, as well as live photo taking from different angles.

There were exams in so many districts

1) Examinations held throughout the year - 10

2) Examination centers across the state - 1200

3) Examination centers in a district - 1 to 150

4) Classrooms required across the state - 15000

5) Maximum number of rooms required in a district - 1900

6) Outstanding students at an examination center - 504

7) Kamala students in one room - 24

8) Exam days - 1 to 3


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda