आता बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप

By Naukari Adda Team


आता बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप  , Successful 12th standard students will now get laptops

मध्य प्रदेश बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली. ही योजना पुन्हा सुरू केली जात आहे. विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत लॅपटॉप खरेदीसाठी २५ हजार रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती चौहान यांनी ट्विटद्वारे दिली.

मध्य प्रदेश राज्य मंडळाचा बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत.

अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी ‘रुक जाना नहीं’

जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी मध्य प्रदेश सरकारने रुक जाना नहीं ही योजना सुरु केली आहे. याअंतर्गत दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना याचवर्षी पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाणार आहे. ही फेरपरीक्षा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देता येणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने ही योजना यापूर्वीच सुरू केली आहे. राज्य मंडळाची दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेतली जाते. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Successful 12th standard students will now get laptops

By Naukari Adda Team


Madhya Pradesh Board's smart students of class XII will be given laptops. The announcement was made by Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan. The scheme is being resumed. Under this scheme, students will be given Rs 25,000 for buying a laptop and a certificate, Chouhan said in a tweet.

Madhya Pradesh State Board XII results were announced on Monday. The best performing students will be given laptops.

'Don't stop' for failed students
The Madhya Pradesh government has started a no-stop scheme for students who fail. Under this, the failed students of class X and XII will be given an opportunity to pass the exam again this year. This re-examination will start from 17th August. Students who have failed in the academic year 2019-20 will be able to take this exam. These students will also be given training. The Maharashtra government has already started this scheme. The 10th and 12th re-examinations of the State Board are held in the month of July. This year, however, the date of the exam has not been announced yet due to lockdown.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda