SSC Result 2020 : 30 वर्ष वयाचा विद्यार्थी, अखेर झाला 16 वर्षानंतर दहावी पास!

By Naukari Adda Team


SSC Result 2020 : 30 वर्ष वयाचा विद्यार्थी, अखेर झाला 16 वर्षानंतर दहावी पास!, SSC Result 2020: 30 year old student, finally passed 10th after 16 years!

SSC Result 2020 : 30 वर्ष वयाचा विद्यार्थी, अखेर झाला 16 वर्षानंतर दहावी पास!

 

नाशिक, 29 जुलै : शैक्षणिक आयुष्यात दहावीचा टप्पा हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे दहावीची परीक्षा पास होणे हे सर्वांचे पहिले ध्येय असते. पण, दहावीची परीक्षा पास होण्यासाठी जर 16 वर्ष लागली तर? दचकू नका, नाशिकमधील निलेश भास्कर बोराडे सोबत हा प्रकार घडला आहे. अखेर 16 वर्षांनंतर निलेश दहावी पास झाला आहे.

कष्ट,जिद्द,चिकाटी आणि परिश्रम करण्याची ताकद असली तर कोणताही माणूस यश संपादन करू शकतो हे सिद्ध करून दाखविले आहे घोटीतील एका जिद्दी युवकाने. स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन नावलौकिक करणाऱ्या या युवकाचे शिक्षण अवघे सातवीपर्यंत झाल्याने मनी देशसेवेची इच्छा असणाऱ्या युवकाला सैन्यात जाण्यापासून वंचित रहावे लागत होते.

मात्र, त्याने मोठ्या जिद्दीने दहावीची परीक्षा देऊन घवघवीत यश मिळविल्याने सैन्यात जाण्याचा मार्ग सुकर बनविला आहे. घोटीतील राष्ट्रीय धावपट्टू वयाच्या तिसाव्या वर्षी दहावीत 65 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्याने देशसेवेसाठी लष्करात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने राष्ट्रीय धावपट्टू निलेश भास्कर बोराडे याचे कुटुंबाय आनंदी झाले आहे.

घरची परिस्थिती बेताची असल्याने निलेशने सातवीत शिक्षण सोडावे लागले. मातीखाण काम करून दररोज 30 किलोमीटर मुंबई नाशिक महामार्गावर अनेकांना धावतांना कसरत करत तब्बल चौदा वर्षांनी दहावीत घवघवीत यश संपादन केले.

देशाच्या अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी होत, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत धावणारी आंतरराष्ट्रीय धावपट्टू सुपी सुपिया हिच्या बरोबर धुळे ते कसारा 230 किलोमीटर अंतरावर साथ दिली.

जम्मू काश्मीर,दार्जिलिंग, गुहाटी, कारगिल यांसह देशाच्या विविध राज्यात मॅरेथॉनमध्ये निलेशने भाग घेत देशाच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख निर्माण केली.

विविध स्पर्धेच्यामाध्यमातून आत्ता पर्यंत बारा हजार पाचशे किलोमीटर धावण्याचा विक्रम त्याने केला आहे. यातून अनेक गोल्ड मेडल मिळवले आहे. अखेर दहावी पास झाल्यामुळे निलेशला लष्करात भरती होण्याची संधी मिळाली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


SSC Result 2020: 30 year old student, finally passed 10th after 16 years!

By Naukari Adda Team


SSC Result 2020: 30 year old student, finally passed 10th after 16 years!


Nashik, July 29: The tenth stage of academic life is very important for all. Therefore, passing the matriculation examination is the first goal of all. But, what if it takes 16 years to pass the matriculation exam? Don't worry, this has happened with Nilesh Bhaskar Borade from Nashik. Finally, after 16 years, Nilesh has passed 10th.

A stubborn youth from Ghoti has proved that any man can achieve success if he has the strength to work hard, perseverance and perseverance. The young man, who has made a name for himself by participating in marathons from the local to the international level, was deprived of joining the army as he was only seven years old.

However, his stubborn success in the matriculation examination has paved the way for him to join the army. The family of national sprinter Nilesh Bhaskar Borade is happy that the dream of enlisting in the army for national service will come true after the Ghoti national sprinter passed the 10th standard with 65% marks in the 10th year.

Nilesh had to drop out of seventh grade due to poor conditions at home. After working for 30 years on the Mumbai-Nashik highway, many of them achieved success in the tenth year after 14 years.

Participating in many marathons of the country, he ran with Supi Supia, an international runner from Kashmir to Kanyakumari, at a distance of 230 km from Dhule to Kasara.

Nilesh has made a name for himself in various parts of the country, including Jammu and Kashmir, Darjeeling, Guwahati and Kargil.

He has so far set a record of running twelve thousand five hundred kilometers through various competitions. It has won many gold medals. Nilesh has finally got the opportunity to enlist in the army as he has passed 10th.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda