मोठी बातमी ! एमपीएससी च्या मुख्य परीक्षा आता ऑनलाइन

By Naukari Adda Team


मोठी बातमी ! एमपीएससी च्या मुख्य परीक्षा आता ऑनलाइन, Big news! MPSC s main exams are now online

मोठी बातमी ! "एमपीएससी'च्या मुख्य परीक्षा आता ऑनलाइन


राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बाराशे परीक्षा केंद्रे आहेत. सद्यःस्थितीत पूर्व व मुख्य परीक्षा घेण्यास येणाऱ्या अडचणींमुळे परीक्षा व निकाल वेळेत लागावेत म्हणून आयोगाने यापुढील मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेस किमान विद्यार्थी असतात, त्यामुळे आयोगाने हे पाऊल उचलले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच ठेवला जाणार असून, या परीक्षेचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवेच्या पीएसआय, एसटीआय, गट-क संवर्गातील मुख्य परीक्षा ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक ते दीडशे परीक्षा केंद्रे आहेत, तर त्या परीक्षा केंद्रांमध्ये एकूण 15 हजार वर्गखोल्या आहेत. एका खोलीत 24 विद्यार्थी बसविले जातात. ऑफलाइन परीक्षा घेण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, विविध कारणास्तव खोल्यांची अपुरी उपलब्धता, विद्यार्थी व परीक्षकास येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी ऑनलाइनचा पर्याय सुयोग्य असल्याचे आयोगाचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील निवडक परीक्षा केंद्रे निवडून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येईल, जेणेकरून निकाल वेळेत लावता येणे शक्‍य होणार आहे, असे आयोगातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले. मात्र, तांत्रिक घोळामुळे महापरीक्षा पोर्टलला विरोध करून ते पोर्टल रद्द करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाचा हा निर्णय पचनी पडेल का, हा मोठा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Big news! MPSC s main exams are now online

By Naukari Adda Team


Big news! "MPSC's main exams are now online


The Maharashtra Public Service Commission has twelve hundred examination centers in 36 districts of the state. At present, due to the difficulties in conducting the pre- and main examinations, the Commission has started planning to conduct the next main examinations online so that the examinations and results can be held on time. After the pre-examination, the main examination has a minimum number of students, so the commission has taken this step. A CCTV watch will be placed at each examination center and video shooting of the examination will be done.

The main examinations of PSI, STI, Group-C category of Maharashtra Public Service Commission will be conducted online. Each district in the state has at least one to one and a half hundred examination centers, while those examination centers have a total of 15,000 classrooms. 24 students are accommodated in one room. The Commission is of the view that the manpower required for conducting offline examinations, inadequate availability of rooms for various reasons, and the online option is the best way out of the difficulties faced by the students and examiners. Against this backdrop, selected examination centers in each district will be selected and students will be able to take online exams at those places, so that the results can be posted in time, said a senior official of the commission. However, the big question now is whether the students who opposed the Mahapariksha portal due to technical glitches will have to digest the decision of the commission.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda