यूपीएससी मध्ये महाराष्ट्र झळकला

By Naukari Adda Team


यूपीएससी  मध्ये महाराष्ट्र झळकला, Maharashtra shines in

'यूपीएससी' मध्ये महाराष्ट्र झळकला

 

 मुंबई-   केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सन २०१मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात यंदाही इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असलेल्या आणि पूर्वी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने प्रथम क्रमांक पटकावला. राज्यातून नेहा प्रकाश भोसले हिने १५वा क्रमांक पटकावला. तर मूळच्या बीडच्या पण पुण्यातून तयारी केलेल्या मंदार पत्की याने २२वा तर आशुतोष कुलकर्णी याने ४४वा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर इंजिनीअर झाल्यानंतर दृष्टी गमावलेल्या जयंत मंकले याने १४३वा क्रमांक पटकावत आपले स्वप्न साकारले आहे. यंदा ६०हून अधिक मराठी उमेदवारांनी या परीक्षेत यश मिळवले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने वर्ष २०१९-२०साठी सप्टेंबर, २०१९मध्ये मुख्य परीक्षा घेतली होती. तर फेब्रुवारी आणि जुलैमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. यातील यशस्वी उमेदवारांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर झळकली. या परीक्षेत जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. एकूण ८२९ उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस यूपीएससीने केली आहे. ११ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. यंदा प्रथमच लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कोट्यातून ७८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा, केंद्रीय सेवांमधील गट 'अ' आणि गट 'ब'मधील सेवांमध्ये नियुक्ती दिली जाईल.

या वर्षी निकालाच्या प्राथमिक विश्लेषणातून यंदाही इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारल्याचे दिसून येते. किंबहुना राज्यातून चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी हे इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असलेले आहेत. याचबरोबर यापूर्वीच्या प्रयत्नांमध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले व सध्या अन्य सेवेसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. प्रशासकीय सेवेत किंवा परराष्ट्र सेवेतच काम करण्याचे ध्येय असणारे यामध्ये अधिक आहेत. त्यासाठी पूर्वी गुण कमी पडल्याने त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश मिळाले आहे. राज्यातील यशस्वी उमेदवारांमध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांपेक्षा राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसले. वर्ष २०२०मधील यूपीएससी परीक्षा ३१ मे रोजी पार पडणार होती. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ४ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

 

 

दृष्टिहीन विद्यार्थ्याचे यश

जयंत मंकले या पुण्याच्या दृष्टिहीन विद्यार्थ्याने या परीक्षेत १४३वा क्रमांक पटकावला आहे. याआधीही जयंत मंकले याने लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यावेळी जयंतचा ९३७वा क्रमांक होता. नंतर दोन वर्षे जिद्दीने अभ्यास करून जयंतने पुन्हा परीक्षा दिली व यश मिळवले. संगमनेरच्या अमृतवाहिनी कॉलेजमधून २०१३मध्ये प्रथम श्रेणीतून जयंतने मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे व भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनीअर म्हणून नोकरी केली. याच दरम्यान जयंतला डोळ्यांचा आजार उद्भवला.

स्वप्न साकार केल्याचा आनंद - मंदार पत्की

वडील सरकारी सेवेत असल्यामुळे आठवीपासून प्रशासकीय सेवेविषयी ओढ निर्माण झाली. त्यामुळे दहावीतच प्रशासकीय सेवेत जाण्याचा निश्‍चय केला होता. आई-वडिलांचे स्वप्न साकार केल्याचा आनंद आहे. मी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण बीडमध्ये केल्यानंतर मी व्हीआयटीमधून २०१८मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर यूपीएससीची तयारी केली. वडील जयंत पत्की एमएसईबीमधून २०१८मध्ये कार्यकारी अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत. खासगी क्लास व त्यानंतर ज्ञानप्रबोधिनी अभ्यासिकेत अभ्यास केला. दररोज दहा ते बारा तास अभ्यास करायचो.

आई-वडिलांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळेच यश - आशुतोष कुलकर्णी

मुक्तांगण शाळेत शिकलो आणि पुणे विद्यार्थीगृहातून २०१५मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले. साधारण चार वेळा यूपीएससी परीक्षा दिली. कोचिंगसाठी चाणक्य मंडल परिवारामध्ये होतो. पहिले तीन वर्षे दररोज आठ ते नऊ तास अभ्यास केला. वडील सीडॅकमध्ये इंजिनीअर आहेत. तर आई बँकेतील नोकरीमधून ब्रँच मॅनेजर या पदावरून निवृत्त झाली आहे. अपयश येत असताना आई-वडिलांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळेच यश मिळाले. सध्या यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वयाच्या २५ वर्षापर्यंत पूर्णवेळ अभ्यास करून परीक्षा द्यावी. मात्र त्यानंतर एखादा जॉब करत परीक्षा द्यावी. कारण करीअरही महत्त्वाचे आहे.
आठवडा किंवा महिन्याचे लक्ष्य ठेवून अभ्यास करा - नेहा देसाई

मी मुळची सिंधूदुर्ग जिल्ह्यातील असून पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमध्ये विधीचे शिक्षण घेत होते. तेव्हापासूनच यूपीएससीची तयारी केली. २०१६पासून अभ्यास करत होते. कोचिंगसाठी चाणक्य मंडल परिवारामध्ये होते. माझे वडील गुंतवणूक सल्लागार आहेत. तर आई बीएसएनएलमध्ये नोकरी करत होती. ज्या विद्यार्थिनी सध्या यूपीएससीची तयारी करत आहेत, त्यांनी आठवडा किंवा महिन्याचे अभ्यासाचे लक्ष्य ठेवून जर अभ्यास केला तर त्यांना नक्की यश मिळू शकते असा सल्ला दिला आहे.आयपीएसची नोकरी स्वीकारल्यानंतर आयएएस...इच्छा पूर्ण - योगेश पाटील

मागील वर्षी आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण केली आणि मला जिल्हाधिकारी व्हायची इच्छा होती. मणिपूर येथे आयपीएसची नोकरी स्वीकारल्यानंतरही पुन्हा एकदा तरी परीक्षा द्यावी असे मला वाटले. म्हणून मी ही परीक्षा दिली आणि माझी इच्छा पूर्ण झाली. मी मूळचा नांदेडचा असून श्रीकर परदेशी यांच्याकडून प्रेरणा घेत मी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला. यामुळे बीटेकचे शिक्षण झाल्यानंतर मी या परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली.

 

यूपीएससीतील यशस्वी मराठी उमेदवार

रँक आणि नाव

१५ नेहा भोसले

२२ मंदार पत्की

४४ आशुतोष कुलकर्णी

६३ योगेश पाटील

९१ विशाल नरवडे
१०९ राहुल चव्हाण१३७ नेहा देसाई

१३५ कुलदीप जंगम

१४३ जयंत मंकले

१५१ अभयसिंह देशमुख

२०४ सागर मिसाळ

२१० माधव गित्ते

२११ कुणाल चव्हाण

२१३ सचिन हिरेमठ

२१४ सुमित महाजन

२२६ अविनाश शिंदे

२३० शंकर गिरी

२३१ श्रीकांत खांडेकर

२४९ योगेश कापसे

४३३ अविनाश जाधववर

४३९ परमानंद दराडे


४९७ सुब्रमण्य केळकर

६५१ अशित कांबळे

७७३ अश्विन घोलपकर

७८९ अजिंक्य विद्यागर


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Maharashtra shines in 'UPSC'

By Naukari Adda Team


Maharashtra shines in 'UPSC'


Mumbai: The results of the Central Public Service Commission's (UPSC) Civil Service Examination for the year 201 were announced on Tuesday. The results show that this year too, the students who have an engineering background and have passed the UPSC exam in the past are the ones who are dominant. Pradip Singh bagged the first number in the examination. From the state, Neha Prakash Bhosale finished 15th. Mandar Patki, originally from Beed but from Pune, finished 22nd and Ashutosh Kulkarni 44th. Also, Jayant Mankale, who lost his sight after becoming an engineer, has achieved his dream by finishing 143rd. This year more than 60 Marathi candidates have succeeded in this exam.

The Central Public Service Commission had conducted the main examination for the year 2019-20 in September, 2019. Interviews were conducted in February and July. The list of successful candidates appeared on the website of the Central Public Service Commission. Jatin Kishor and Pratibha Verma are second and third respectively in this examination. A total of 829 candidates have been recommended by the UPSC. Results of 11 candidates have been reserved. This year, for the first time, 78 candidates have been selected from the economically weaker quota. Successful candidates in this examination will be appointed in Indian Administrative Service, Indian Foreign Service, Indian Police Service, Group 'A' in Central Services and Group 'B'.

Preliminary analysis of the results this year shows that engineering students have won the results this year as well. In fact, most of the students who have passed with good marks from the state are from engineering background. In addition, the students who have passed the UPSC examination in the previous efforts and are currently undergoing training for other services have also achieved significant success. There are more who want to work in the administrative service or in the foreign service. He tried again after losing points earlier and he has succeeded in that. Among the successful candidates in the state, the number of students in rural areas of the state is more than the number of students in Pune. The UPSC exam for the year 2020 was to be held on May 31. But due to Corona's background, the exam has been postponed till October 4.

The success of the blind student

Jayant Mankale, a blind student from Pune, has secured 143rd position in this examination. Earlier, Jayant Mankale had appeared for the Public Service Commission examination. At that time, Jayant was ranked 937th. After studying hard for two years, Jayant took the exam again and succeeded. Jayant graduated from Amrutvahini College, Sangamner in 2013 with a degree in Mechanical Engineering. After that he worked as a maintenance engineer at Talegaon Dabhade and Bhosari for two years. Meanwhile, Jayant contracted eye disease.

The joy of making a dream come true - Mandar Patki

Since his father was in government service, his interest in administrative service started from the age of eight. Therefore, he had decided to join the administrative service at the age of ten. I am happy that my parents' dream has come true. I have achieved success on the first try. After studying up to Class X in Beed, I graduated from VIT in 2018 with a degree in Mechanical Engineering. He then prepared for UPSC. Father Jayant Patki has retired from MSEB in 2018 as Executive Engineer. He studied in a private class and then in Jnanprabodhini. I used to study for ten to twelve hours every day.

Success is due to the cooperation and guidance of parents - Ashutosh Kulkarni

Learned in Muktangan School and did Mechanical Engineering in 2015 from Pune Student House. Passed UPSC exam about four times. Chanakya Mandal is in the family for coaching. For the first three years, I studied eight to nine hours a day. The father is an engineer at CEDAC. The mother has retired from the bank as a branch manager. Success is due to the cooperation and guidance of the parents in the face of failure. At present, students doing UPSC should study full time till the age of 25 and take the exam. But after that you should do a job and take an exam. Because career is also important.
Study with a goal of a week or a month - Neha Desai

I am a native of Sindhudurg district and was studying law at ILS Law College, Pune. Since then I have been preparing for UPSC. I was studying since 2016. Chanakya Mandal was in the family for coaching. My father is an investment advisor. So my mother was working in BSNL. Students who are currently preparing for UPSC are advised that if they study with the aim of studying for a week or a month, they can definitely succeed.After accepting the job of IPS, IAS ... wish fulfilled - Yogesh Patil

Passed the IPS exam last year and I wanted to be a collector. Even after accepting the IPS job in Manipur, I felt that I should take the exam once again. So I took this test and my wish came true. I am a native of Nanded and inspired by Shrikar Pardeshi, I decided to join the administrative service. So after I got my BTech education, I started preparing for this exam.


Successful Marathi candidates in UPSC

Rank and name

15 Neha Bhosle

22 Mandar Patki

44 Ashutosh Kulkarni

63 Yogesh Patil

91 Vishal Narwade
109 Rahul Chavan137 Neha Desai

135 Kuldeep Jangam

143 Jayant Mankale

151 Abhay Singh Deshmukh

204 Sagar Misal

210 Madhav Gitte

211 Kunal Chavan

213 Sachin Hiremath

214 Sumit Mahajan

226 Avinash Shinde

230 Shankar Giri

231 Srikant Khandekar

249 Yogesh Kapase

433 on Avinash Jadhav

439 Parmanand Darade


497 Subramanya Kelkar

651 blankets

773 Ashwin Gholapkar

789 Ajinkya Vidyagar


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda