दहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच !!

By Naukari Adda Team


दहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच !!, Tenth-twelfth re-examination decision not yet !!

दहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच, यंदा अनुत्तीर्णांचा जीव टांगणीला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यंदा फेरपरीक्षाचा निर्णय मंडळाकडून अद्याप घेण्यात आला नाही. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची व पालकांची धाकधूक वाढली असून त्यांचे यंदाचे वर्ष वाया जाणार की काय अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधी वाढवल्यामुळे मंडळाला निर्णय घेण्यास उशिरा लागत असल्याची माहिती पुढे येत असली तरी यासंदर्भात मंडळाने निर्णय लवकर जाहीर करावा अशी मागणी शिक्षक, पालक करत आहेत. कोरोनाचा संसर्ग पाहता, आॅगस्ट महिन्यातही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे दिसून येते. शाळा व शैक्षणिक संस्था या कालावधीत बंदच राहणार आहेत. त्यामुळे निकालानंतर लगेचच आॅगस्टमध्ये ही परीक्षा घेणे शक्य नाही. यंदा मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकातही या परीक्षांबाबत उल्लेख केलेला नाही. एकीकडे आॅनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत.

एकीकडे अकरावी प्रवेशप्रक्रिया तर दुसरीकडे बारावीनंतरच्या पदवी प्रवेशप्रक्रियांनाही सुरुवात झाली आहे. या प्रवेशप्रक्रिया पार पडण्याच्या आत फेरपरीक्षा होऊन निकाल जाहीर न झाल्यास आणि परीक्षांना लेटमार्क लागला तर उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती शिक्षक व्यक्त करत आहेत. हीच भीती पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातही आहे. यंदा दहावीचा राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला असून परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ७३ हजार ९९८ इतकी आहे, तर बारावीचा राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून राज्यातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३१ हजार ९७५ इतकी आहे.

एकीकडे अकरावी प्रवेशप्रक्रिया तर दुसरीकडे बारावीनंतरच्या पदवी प्रवेशप्रक्रियांनाही सुरुवात झाली आहे. या प्रवेशप्रक्रिया पार पडण्याच्या आत फेरपरीक्षा होऊन निकाल जाहीर न झाल्यास आणि परीक्षांना लेटमार्क लागला तर उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती शिक्षक व्यक्त करत आहेत.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Tenth-twelfth re-examination decision not yet !!

By Naukari Adda Team


The decision of the 10th-12th re-examination has not been taken yet

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has not yet decided on the re-examination for the students who failed the Class X-XII examination held in February-March. This has increased the anxiety of the students and parents who have failed and they are worried that this year will be wasted.

Teachers and parents are demanding that the board announce its decision soon, despite reports that the lockdown period has been delayed due to the Corona's background. Given the corona infection, the situation is likely to continue in August. Schools and educational institutions will remain closed during this period. Therefore, it is not possible to take this exam in August immediately after the result. The press release issued by the board this year also did not mention about these examinations. On the one hand, online schools have started.

On the one hand, the eleventh admission process and on the other hand, the post-twelfth degree admission process has also started. Teachers are expressing fears that the students' year will be wasted even if they pass the re-examination if the results are not declared and the marks are late. The same fear is in the minds of parents and students. This year, the state result of class X is 95.30 per cent and the number of students who failed the exam is 73,998, while the state result of class XII is 90.66 per cent and the number of students who failed in the state is 1 lakh 31 thousand 975.

On the one hand, the eleventh admission process and on the other hand, the post-twelfth degree admission process has also started. Teachers are expressing fears of wasting the students' year even after passing the re-examination if the results are not declared and the marks are late.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda