कट ऑफ मध्ये वाढ आणि मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर....

By Naukari Adda Team


कट ऑफ मध्ये वाढ आणि मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर...., Increase in cut off and announcement of first merit list of Mumbai University ....

बारावीचा निकाल यंदा चांगला लागला आहे. त्याचा परिणाम आज जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीवर दिसून येत आहे.

मुंबई विद्यापीठाची पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी दुपारी ३ वाजता जाहीर झाली. महाविद्यालयांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर मेरिट लिस्ट जाहीर केली. सर्व कॉलेजांमधील कला शाखेच्या कट ऑफमध्ये वाढ झाली आहे.

माटुंगा येथील डी.जी. रुपारेल महाविद्यालय वगळता सर्व ठिकाणी कला शाखेची कट ऑफ टक्केवारी वाढली आहे. वाणिज्य शाखांच्या प्रवेशांच्या कट-ऑफमध्येही सरासरी १ टक्क्याने वाढ झाली आहे. विज्ञान शाखेच्या प्रवेशांची कट-ऑफ संमिश्र आहे. काही ठिकाणी विज्ञान शाखेची कट ऑफ वाढली आहे, तर काही महाविद्यालयांमध्ये कमी आहे.

विद्यार्थ्यांनी आज जाहीर झालेल्या यादीनुसार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत कागदपत्र पडताळणी करून शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. दुसरी गुणवत्ता यादी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे.

मुंबईतल्या काही नामांकित कॉलेजांची कट-ऑफ टक्केवारी पाहण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे –
१) जयहिंद कॉलेज – https://bit.ly/33uXWbM

२) एचआर कॉलेज – https://www.hrcollege.edu/degree-college-2/

३) केसी कॉलेज – https://www.kccollege.edu.in/merit_list_2021.php

४) रुपारेल कॉलेज – https://bit.ly/2EZUyeN

५) विल्सन कॉलेज – https://www.wilsoncollege.edu/

६) सेंट झेवियर्स कॉलेज – http://xaviers.edu/main/

७) मिठीबाई कॉलेज – http://mithibai.ac.in/MERIT%20LISTS%202020-21/M__63

प्रवेशांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –

१) अर्ज विक्री – २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०

२) प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत)

३) प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे – २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत)

४) पहिली गुणवत्ता यादी – ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता)

५) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)

६) दुसरी गुणवत्ता यादी – ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)

७) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)

८) तिसरी गुणवत्ता यादी – १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)

९) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Increase in cut off and announcement of first merit list of Mumbai University ....

By Naukari Adda Team


The result of class XII is good this year. The result is visible on the first quality list released today.

The first merit list of first year admissions of Mumbai University degree courses was announced on Thursday at 3 pm. Colleges announced merit lists on their official websites. There has been an increase in the cut off of the arts branch in all colleges.

D.G. at Matunga. The cut-off percentage of arts branch has increased in all places except Ruparel College. The cut-off for commercial branch admissions has also increased by an average of 1 per cent. The cut-off for science admissions is composite. The cut-off for science has increased in some places, while it has decreased in some colleges.

According to the list announced by the students today, they have to confirm their admission on August 11 by 3 pm by verifying the documents and paying the fee. The second merit list will be announced on August 11 at 7 pm.

Here is the link to see the cut-off percentage of some reputed colleges in Mumbai -
1) Jayhind College - https://bit.ly/33uXWbM
2) HR College - https://www.hrcollege.edu/degree-college-2/

3) Casey College - https://www.kccollege.edu.in/merit_list_2021.php

4) Ruparel College - https://bit.ly/2EZUyeN

5) Wilson College - https://www.wilsoncollege.edu/

6) St. Xavier's College - http://xaviers.edu/main/

7) Mithibai College - http://mithibai.ac.in/MERIT%20LISTS%202020-21/M__63

The detailed schedule of admissions is as follows -
1) Sale of Applications - 24th July 2020 to 5th August 2020

2) Pre-Admission Registration (on University Website) - 22nd July 2020 to 5th August 2020 (till 1pm)

3) Submission of application form along with copy of pre-admission application - 27th July 2020 to 5th August 2020 (till 3 pm)

4) First merit list - 6th August 2020 (11 am)

5) Document Verification and Fees - 6th August 2020 to 11th August 2020 (till 3pm)

6) Second Quality List - 11th August 2020 (7 pm)

7) Document Verification and Fees - 12th August 2020 to 17th August 2020 (till 3 pm)

8) Third merit list - 17th August 2020 (7 pm)

9) Document Verification and Fees - 18th August 2020 to 21st August 2020 (till 3 pm)


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda