CET होणार की नाही? काय म्हणाले उच्च शिक्षणमंत्री?

By Naukari Adda Team


CET होणार की नाही? काय म्हणाले उच्च शिक्षणमंत्री?, Will there be CET or not? What did the Minister of Higher Education say?

राज्यातील सीईटी संदर्भात सीईटी सेलचे आयुक्त आढावा घेत आहेत… असे सांगतानाच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री परीक्षेविषयी नेमके काय म्हणाले वाचा…

पुणे: राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्ष पदवी परीक्षांबाबत राज्य सरकारची जी भूमिका आहे तीच सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. कोविड – १९ संसर्ग परिस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा महाराष्ट्रात होऊ शकत नाहीत, हेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार करत आहोत. पण या संपूर्ण विषयाबाबत गैरसमज पसरवला गेला आहे. परीक्षा घेणार नाही असं आम्ही कोणत्याही जीआरमध्ये म्हटलेलं नाही. परिस्थिती सामान्य झाल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्याय खुला राहील असेच आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे राज्यातील सीईटीसंदर्भात ७-८ दिवसात बैठक होऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

उदय सामंत गुरुवारी पुण्यात होते. तेथे त्यांनी एक आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि सीईटीबाबत सामंत यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, ‘सीईटी परीक्षेचं आयोजन करण्यात सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणावर आपण विद्यार्थ्यांना आणू शकतो का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तालुका स्तरावर शिवाय विभागीय स्तरावर सीईटीची परीक्षा केंद्रे करू शकतो का याचा सर्व्हे सीईटी आयुक्त करत आहेत. सीईटीच्या आयुक्तांना स्वायत्त अधिकार दिले गेले आहेत. येत्या ७-८ दिवसात सीईटीसंबंधी बैठक होऊन निर्णय घेतला जाईल.’

‘आम्ही आधी हे पाहतो आहोत की सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांची सीईटी घेता येईल का, तालुका स्तरावर संस्था सक्षम आहेत का, व्यवस्था कशी आहे या सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. सीईटी यंत्रणा स्वायत्त आहे, त्यांचे यासंबंधीचे सर्वेक्षण सुरू आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर बारावीच्या गुणांवर प्रवेश देण्याचा विचारही केला जाऊ शकतो,’ असेही सामंत म्हणाले.

दरम्यान, पदवी परीक्षा सप्टेंबरअखेरपर्यंत घ्याव्यात असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांना दिले आहेत. हे निर्देश ६ जुलै रोजी मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून यूजीसीने दिले आहेत. यूजीसीच्या या निर्णयाविरोधात युवा सेनेसह अनेक विद्यार्थी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावरील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Will there be CET or not? What did the Minister of Higher Education say?

By Naukari Adda Team


The Commissioner of CET Cell is reviewing the CET in the state. Read exactly what the Minister of Higher and Technical Education said about the exam.

Pune: The role of the state government in the final year degree examinations of state universities has been presented in the Supreme Court. Kovid - 19 In the case of infection, the examinations of the Department of Higher and Technical Education cannot be held in Maharashtra, this is what we have mentioned in the affidavit submitted to the Supreme Court. We are only looking after the interests of the students. But misconceptions have been spread about the whole subject. We have not said in any GR that we will not take the exam. "We have been saying from the beginning that the option of giving exams to students will remain open once the situation returns to normal," Higher and Technical Education Minister Uday Samant said. On the other hand, a decision regarding CET in the state will be taken in 7-8 days, he added.

Uday Samant was in Pune on Thursday. There they held a review meeting. He was then talking to the media. Samant informed about the final year exams and CET.

He said, ‘The biggest problem in conducting the CET exam is whether we can bring in a large number of students at the district level. Another important point is that the CET Commissioners are conducting a survey to see if the CET examination centers can be set up at the taluka level as well as at the divisional level. The commissioners of the CET have been given autonomous powers. A decision on the CET will be taken in the next 7-8 days. '

‘We are already looking at whether all the rules of social distance can be followed to get the CET for around five and a half lakh students, whether the institutions at the taluka level are competent, how the system is functioning. The CET system is autonomous, and a survey is underway. In case of emergency, admission to 12th standard can also be considered, 'said Samant.

Meanwhile, the University Grants Commission has directed all universities in the country to conduct degree examinations by the end of September. These instructions were issued by the UGC on July 6 through guidelines. Several student organizations, including Yuva Sena, have appealed to the Supreme Court against the UGC's decision. The hearing will be held on August 14.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda