MPSC: 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर

By Naukari Adda Team


MPSC: 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर, MPSC: Recruitment Examination for various posts to be held on September 20, 2020, now not only in Mumbai and Pune, but at all Divisional Centers in the State

मुंबई: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाईल.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.

अखेर 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे.  यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.  अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MPSC: Recruitment Examination for various posts to be held on September 20, 2020, now not only in Mumbai and Pune, but at all Divisional Centers in the State

By Naukari Adda Team


Mumbai: The Maharashtra State Public Service Commission's recruitment examination for various posts to be held on September 20, 2020, will now be conducted not only in Mumbai and Pune, but at all the divisional centers in the state.

Assembly Speaker Nana Patole today held discussions with Maharashtra Public Service Commission Chairman Satish Gavai on behalf of the candidates. Suggested that the revenue should be collected at the departmental centers.

Finally, the Maharashtra Public Service Commission has approved the suggestion that the examination, which will be held on September 20, 2020, should be conducted at all revenue departmental centers in the state, including Mumbai and Pune. This is a great relief to those who want to take the competitive exam.

The decision is being welcomed by all sections of the state as Assembly Speaker Nana Patole has taken the initiative in this regard and removed the problem of candidates appearing for the examination. Many candidates have thanked the Speaker in this regard.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda