सप्टेंबर मध्ये होणार दहावी, बारावी सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षा !

By Naukari Adda Team


सप्टेंबर मध्ये होणार दहावी, बारावी सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षा ! , Tenth, Twelfth CBSE Compartment Examination to be held in September!

CBSE Compartment Exam 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचे (फेरपरीक्षा) आयोजन केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची लिंक सुरु करण्यात आली आहे. जे विद्यार्थी एक किंवा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांचा दहावी किंवा बारावीचा निकाल कंपार्टमेंट म्हणून जाहीर करण्यात आला आहे, असे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार कंपार्टमेंट परीक्षेसाठी २० ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षा २०२० सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे.

सीबीएसईने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ‘कंपार्टमेंट परीक्षा सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाईल. परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाईल.’ नियमित विद्यार्थी आपल्या शाळेच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. मात्र, खासगी स्तरावर उमेदवार सीबीएसईचे अधिकृत संकेतस्थळ www.cbse.nic.in वर जाऊन थेट अर्ज करू शकतात. सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षेसाठी अर्ज तेव्हाच स्वीकारले जातील जेव्हा विद्यार्थी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या आधी अर्जाचे शुल्क जमा करतील. परीक्षा अर्ज, परीक्षा शुल्क आदी अर्जाशी संबंधित सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यावर्षी सीबीएसई बारावीत ८७,६५१ विद्यार्थ्यांना कंपार्टमेंटसाठी पात्र हा शेरा मिळालेला आहे. यावर्षी बारावीचा निकाल ८८.७८ टक्के लागला होता. दहावीचे १,५०,१९८ विद्यार्थी कंपार्टमेंटसाठी पात्र आहेत. बोर्डाने दहावीचा निकाल १५ जुलै रोजी जारी केला होता. दहावीचा निकाल यंदा ९१.४६ टक्के लागला होता.

फेरपरीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयाला पत्र

दरम्यान, देशभरातून एकूण सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसई फेरपरीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून सीबीएसईच्या फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाची दखल घेऊन (स्यू मोटो) सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. कोविड – १९ महामारी काळात परीक्षा घेण्याचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय विद्यार्थी हिताचा नाही, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

CBSE 10th & 12th Exam 2020 : सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांबद्दल बोर्डाने माहिती दिली आहे…

CBSE compartment exam 2020 latest update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) या वर्षी फेरपरीक्षा घेणार की नाही… हजारो विद्यार्थी-पालकांना हा प्रश्न सतावत आहे. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या उर्वरित बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता फेरपरीक्षा होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. यासंदर्भात बोर्डाचं स्पष्टीकरण देखील आलं आहे.

बोर्डाने सांगितलं, ‘आमच्याकडे यावर्षी दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा रद्द करण्याची विनंती आली आहे. पण बोर्ड फेरपरीक्षा रद्द करेल तर अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भविष्यावर विपरित परिणाम होईल. कारण हा दहावी, बारावी बोर्ड परीक्षांचा प्रश्न आहे. त्यामुळे या परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.’

कशी होणार फेरपरीक्षा?

सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे की फेरपरीक्षा घेतल्या जाणार यात शंकाच नाही. या परीक्षा कोविड – १९ महामारीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) नुसार आयोजित केली जाणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती सीबीएसई बोर्ड आपली अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर देणार आहे.

सीबीएसई बोर्डाने १३ जुलै रोजी बारावीचा तर १५ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आल्याने गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही. ईशान्य दिल्ली वगळता देशभरात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या अनेक महत्त्वाच्या विषयांची परीक्षा देशभरात रद्द करावी लागली.

CBSE 10th & 12th Exam 2020 Update : Notice for CBSE Student : As per the news CBSE has issued an official notification regarding the delay in board examination and only 29 subjects will be qualified for Examination. CBSE ने नोटीस बजावली, फक्त 29 विषयांची होणार परीक्षा – CBSE ने बोर्ड परीक्षेमध्ये दिरंगाईबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली असून केवळ 29 विषयांची चाचणी घेण्यात येईल, असे सांगितले आहे. यापूर्वी मानव संसाधन विकास मंत्रालयानेही सांगितले होते की, केवळ 29 विषय परीक्षेसाठी घेतले जातील. ज्या पेपरचे गुण उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक नसतील त्याची परिक्षा घेतली जाणार नाही. त्यामुळे व्यवसाय अभ्यास, भूगोल, सामाजिक विज्ञान आणि इंग्रजी यासारख्या विषयाची चाचणी परीक्षा घेण्यात येईल. या सुधारित परीक्षेची तारीखपत्रक लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा केली जात आहे.

म्हणून, दहावीच्या आयसीटी (माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान) शी संबंधित पेपर, जे हरवले होते ते रद्द केले जाऊ शकते. तसेच बारावीसाठी व्यवसाय अभ्यास, भूगोल, हिंदी (वैकल्पिक आणि कोर), गृह विज्ञान, सामाजिक विज्ञान, संगणक विज्ञान, माहिती अभ्यास (नवीन आणि जुने), माहिती तंत्रज्ञान आणि जैव-तंत्रज्ञानाचे पेपर घेण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर ईशान्य दिल्लीतील निषेधांमध्ये झालेल्या गोंधळाच्या कारणास्तव जे पेपर त्यावेळी रद्द केले गेले होते, तेदेखील घेतले जातील. सीबीएसई बोर्डाची परीक्षा 19 ते 31 मार्च दरम्यान घेण्यात येणार होती, परंतु कोरोना विषाणूमुळे ती पुढे ढकलण्यात आली. याच नोटीसमध्ये सीबीएसईने असेही म्हटले आहे की, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय प्रमोट केले जाईल, तर 9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांना इंटरनल स्कूल असेसमेंटच्या आधारे प्रमोट केले जाईल.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Tenth, Twelfth CBSE Compartment Examination to be held in September!

By Naukari Adda Team


CBSE Compartment Exam 2020: The Central Board of Secondary Education has organized the 10th and 12th compartment examinations (re-examination). The link to fill up the application for this exam has been started. Students who have failed in one or more subjects and their X or XII results have been declared as compartments, can apply online for this exam. Candidates will be able to apply online for compartment examination till 5 pm on August 20.

The CBSE Compartment Examination will be held in September 2020.
The CBSE said in a statement that the ‘compartment examination will be held in September. Exam dates will be announced soon. 'Regular students can apply through their school. However, private candidates can apply directly by visiting the official website of CBSE www.cbse.nic.in. Applications for the CBSE Compartment Examination will be accepted only if the students submit the application fee before the last date of application. All the information related to the application form, examination fee etc. is available on the official website.

This year, 87,651 students in CBSE XII have received the Shera eligible for compartments. This year, the result of class XII was 88.78 percent. 1,50,198 students of class X are eligible for compartments. The board had released the results on July 15. The result of class X was 91.46 percent this year.

Letter to Supreme Court against re-examination
Meanwhile, a total of more than 800 students from across the country have appealed to the Supreme Court against the CBSE re-examination. The students have written a letter to the apex court seeking a hearing on the CBSE's decision to conduct a re-examination (sue moto). Kovid: The decision of the Central Board of Secondary Education to conduct examinations during the 19 epidemic period is not in the interest of the students, say these students.

CBSE 10th & 12th Exam 2020: The Board has informed about the 10th and 12th re-examinations of CBSE Board

CBSE compartment exam 2020 latest update: Whether Central Board of Secondary Education (CBSE) will conduct re-examination this year… This question is bothering thousands of students and parents. The remaining board exams of Class X-XII were canceled on the backdrop of Corona transition. Therefore, there are doubts whether there will be a re-examination or not. The board has also come up with an explanation in this regard.

The board said, "We have received a request to cancel the 10th and 12th re-examinations this year. But if the board cancels the re-examination, it will adversely affect the academic future of many students. Because this is the question of 10th, 12th board exams. Therefore, the board has decided not to cancel this exam. '

How will the re-examination take place?
The CBSE board has made it clear that there is no doubt that a re-examination will be held. This examination will be conducted in accordance with the Standard Operating Procedure (SOP) against the backdrop of Kovid-19 epidemic situation. The CBSE Board will provide detailed information in this regard on its official website cbse.nic.in.

The CBSE Board has announced the results of Class XII on July 13 and Class X on July 15. The merit list has not been announced as students have been given average marks this year. The matriculation examination was held across the country except Northeast Delhi. Examinations in many important subjects of class XII had to be canceled across the country.

CBSE 10th & 12th Exam 2020 Update: Notice for CBSE Student: As per the news CBSE has issued an official notification regarding the delay in board examination and only 29 subjects will be qualified for Examination. CBSE has issued notice, only 29 subjects will be examined - CBSE has issued an official notification regarding delay in board exams and said that only 29 subjects will be tested. Earlier, the Ministry of Human Resource Development had also said that only 29 subjects would be taken for the examination. Papers whose marks are not required for admission in a higher education institution will not be examined. Therefore, subjects like business studies, geography, social sciences and English will be tested. The date of this revised examination is expected to be released soon.

Therefore, the paper related to ICT (Information and Communication Technology) of X, which was lost, can be canceled. Papers in Business Studies, Geography, Hindi (optional and core), Home Science, Social Sciences, Computer Science, Information Studies (New and Old), Information Technology and Biotechnology will also be conducted for Class XII.

Papers that were canceled at the time due to chaos in the protests in north-east Delhi will also be taken up. The CBSE board exam was scheduled to be held between March 19 and 31, but it was postponed due to the corona virus. In the same notice, the CBSE also said that students in classes I to VIII will be promoted without examination, while students in class IX and XI will be promoted on the basis of internal school assessment.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda