दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

By Naukari Adda Team


दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, Big decision of State Board of Education regarding students who could not pass 10th and 12th

 मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. या दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले असून, संभाव्य वेळापत्रकानुसार ही परीक्षा 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

दहावीची परीक्षा 6 ते 23 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीची परीक्षा 6 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होईल. तर व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 6 ते 24 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा 1 ते 23 ऑक्टोबर तर दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्य शिक्षण विषयाची लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा 24 ते 31 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीची प्रात्याक्षिक, लेखी व श्रेणी परीक्षा 1 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. संभाव्य वेळापत्रकाबाबत अभिप्राय, सूचना व दुरुस्त्या ई-मेलद्वारे 17 ऑगस्टपर्यंत [email protected] या मेलवर पाठवण्याच्या सूचना मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Big decision of State Board of Education regarding students who could not pass 10th and 12th

By Naukari Adda Team


MUMBAI: The state board has decided to hold a supplementary examination in October for students who could not pass the 10th-12th exams in February-March 2020 due to the increasing prevalence of corona. The board has announced the probable schedule for the 10th and 12th exams, which will start from October 6.

The 10th exam will be held from October 6 to 23. The 12th standard examination will be held from October 6 to 29. The exams for students with business courses will be held from October 6 to 24. Demonstration, grade and oral examination of 10th standard students will be held from 1st to 23rd October while written and practical examination of work subject of disabled students will be held from 24th to 31st October. Practical, written and grade examination of class XII will be held from 1st to 29th October. Feedback, suggestions and corrections regarding possible schedules have been sent by e-mail to [email protected] by August 17.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda