सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय : नीट आणि जेईई परीक्षा वेळेतच होणार

By Naukari Adda Team


सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय : नीट आणि जेईई परीक्षा वेळेतच होणार, Important decision of the Supreme Court: Neat and JEE exams will be held on time

नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित आहेत. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचं करिअर आपण संकटात टाकत आहोत असं म्हटलं. खंडपीठाने यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं असल्याची नोंद घेतली.
धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही असंही यावेळी न्यायालयाने सांगितलं.सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी परीक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती प्रत्येक काळजी घेतली जाईल असं न्यायालयाला सांगितलं. न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी परीक्षा झाली नाही तर देशाचं नुकसान होणार नाही का ? असा सवाल विचारत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाईल असं म्हटलं.
परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीवरील याचिकेवर बोलताना न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी करोना संकटात आयुष्य पुढे चालत राहिलं पाहिजे, आपण फक्त परीक्षा थांबवू शकतो का ? आपण पुढे चालत राहिलं पाहिजे असं मत नोंदवलं.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Important decision of the Supreme Court: Neat and JEE exams will be held on time

By Naukari Adda Team


The Supreme Court has rejected a petition seeking postponement of NEET and JEE exams. The Supreme Court has ruled that the exams will be held on time. The exams are scheduled for September. It was demanded that the exams be postponed in the wake of the Corona crisis. The hearing was held before a bench of Justice Arun Mishra.

The court, while dismissing the petition, said that it was putting the students' careers in jeopardy as the exams were postponed. The bench noted that the Solicitor General had assured that full care would be taken during the examination.
The court also said that it could not interfere in the policy decision. Solicitor General Tushar Mehta told the court that the examination should be held at this time and every appropriate care would be taken for it. If Judge Arun Mishra doesn't pass the exam, won't the country suffer? Asking such a question, he said that the academic year of the students will be wasted.
Speaking on a petition seeking adjournment of the exam, Judge Arun Mishra said life should continue in the Corona crisis, can we just stop the exam? Reported that we should keep moving forward.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda