महत्वाची घोषणा : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी

By Naukari Adda Team


महत्वाची घोषणा : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी , Important announcement: For job seekers

National Recruitment Agency : करोना संकटानंतर देशात अनेक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’ला (NRA) हिरवा कंदील देण्यात आलाय.

केंद्र सरकारकडून ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’ (NRA) ला हिरवा कंदील देण्यात आलाय. सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिलीय.

 

(भारतीय पशुपालन निगम लिमिटेड अंतर्गत 3348 पदांची भरती.)

 

नोकरी मिळवण्यासाठी सध्या तरुणांना अनेक परीक्षा द्याव्या लागतात. यासाठी २० एजन्सी नेमण्यात आलेल्या आहेत अशा वेळी प्रत्येक एजन्सीसाठी वेगळी परीक्षा देण्यासाठी इच्छूक तरुणांना अनेक ठिकाणी जावं लागतं. परंतु, आता मात्र नॅशनल रिक्रूटमेन्ट एजन्सीद्वारे (राष्ट्रीय भरती परीक्षा) कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (सामान्य पात्रता परीक्षा) घेण्यात येईल. याचा फायदा नोकरीच्या शोधात असलेल्या करोडो तरुणांना होईल, असंही जावडेकर यांनी म्हटलंय.

गेल्या कित्येक वर्षांपासून तरुणांकडून ही मागणी केली जात होती. परंतु, हे आत्तापर्यंत झालं नव्हतं. आता मात्र नॅशन रिक्रूटमेन्ट एजन्सी गठीत करण्यात आल्यानं त्यांचा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होऊ शकेल तसेच त्यांचे पैसेही वाचतील, असं म्हणत त्यांनी याविषयी समाधान व्यक्त केलंय.

 

(सरकारी नोकरीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय : आता होणार सामायिक परीक्षा .)

 

‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’ 

१)  ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’द्वारे कॉमन एन्टरन्स टेस्ट, एसएससी, रेल्वे भरती बोर्ड आणि आयबीपीएस द्वारे आयोजित टीयर १ परीक्षा एकाच वेळी घेता येतील. केंद्र सरकारमध्ये (NRA3 & 4) Gf-B आणि C पदांसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल

२) ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’ मुळे निवड प्रक्रियेचा कालावधीही कमी होऊ शकेल.

३)  ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’द्वारे १००० हून अधिक केंद्रांवर सीईटी आयोजित केली जाऊ शकेल.

४)  प्रत्येक वर्षात दोन वेळा सीईटी आयोजित केली जाईल

५)  सीईटी मध्ये ‘मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह’ प्रश्न असतील अर्थात दिलेल्या अनेक पर्यायांमधून एका उत्तराची निवड परीक्षार्थीला करावी लागेल.

६)  या सीईटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या यादीचा उपयोग राज्य सरकारलाही करता येईल.

७) हे बदल भरती, निवड आणि नोकरी प्रक्रियेत सहजता आणि समाजातील काही वर्गांसाठी मोठे फायदेशीर ठरतील

८) सीईटीची मेरिट लिस्ट तीन वर्षांपर्यंत मान्य राहील. या दरम्यान उमेदवारी आपली योग्यता आणि आवडीनुसार वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी सहज अर्ज करू शकतील

 

(राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना येथे विविध पदांची भरती २०२०.)

 

सरकारी भरती परीक्षा कार्यक्रमासाठी अर्ज प्रक्रिया आणि शुल्क वेगवेगळे असतात. त्यामुळे अनेकदा काही उणिवा राहून जातात. ग्रामीण महिला आणि दिव्यांगांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही आव्हानं ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’मुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतील, असा विश्वासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आलाय.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Important announcement: For job seekers

By Naukari Adda Team


National Recruitment Agency: Many people in the country have lost their jobs after the Corona crisis. Against this backdrop, the Central Government has given the green light to the National Recruitment Agency (NRA).

The National Recruitment Agency (NRA) has been given the green light by the central government. This information was given by Information and Broadcasting Minister Prakash Javadekar after the Union Cabinet meeting held today.

To get a job, young people now have to take many exams. At a time when 20 agencies have been appointed for this purpose, youngsters who want to take a separate exam for each agency have to go to many places. However, the Common Eligibility Test will now be conducted by the National Recruitment Agency. This will benefit crores of job-seeking youth, said Javadekar.

This demand has been made by the youth for the last several years. But, this has not happened till now. However, now that the National Recruitment Agency has been set up, their physical and mental stress can be reduced and their money can be saved, he said.

National Recruitment Agency
1) Tier 1 examinations conducted by National Recruitment Agency, Common Entrance Test, SSC, Railway Recruitment Board and IBPS can be taken simultaneously. Candidates for Gf-B and C posts in Central Government (NRA3 & 4) will be shortlisted

2) Due to National Recruitment Agency, the duration of selection process may also be reduced.

3) CET can be conducted by National Recruitment Agency at more than 1000 centers.

4) CET will be conducted twice a year

5) The CET will have 'Multiple Choice Objective' questions.

6) The list of candidates who have passed this CET can also be used by the State Government.

7) These changes will facilitate recruitment, selection and job process and will be of great benefit to some sections of the society

8) The merit list of CET will be valid for three years. Candidates can easily apply for jobs in different fields according to their qualifications and preferences

The application process and fees for the government recruitment examination program vary. So often some shortcomings remain. Rural women and the disabled face many problems. It is hoped that these challenges will be alleviated to some extent by the National Recruitment Agency.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda