आता घरबसल्या नोकरी शोध: गूगलचे नवे अँप भारतात लाँच

By Naukari Adda Team


आता घरबसल्या नोकरी शोध: गूगलचे नवे अँप भारतात लाँच , Job Search Now: Google launches new app in India

गुगलचं नवं अँप भारतात लाँच झालं आहे. एंट्री लेवलच्या नोकऱ्या शोधण्यासाठी हे अँप खूप फायदेशीर ठरणार आहे.

Google Kormo App for Jobs Search in India: आता धावपळ केल्याशिवाय एका जागी बसून नोकरी शोधण्याची संधी चालून आली आहे. यासाठी पुढाकार घेतला आहे गुगल सर्च इंजिनने. गुगलने आपलं जॉब सर्च अॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. गुगलच्या या जॉब सर्च अॅपचं नाव आहे – कॉर्मो (Kormo). हे अँप भारतातील लाखो तरुणांना एंट्री लेवलच्या नोकऱ्या शोधण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार असल्याचा दावा गुगलने केला आहे.

टेक क्रंचनुसार गुगलने भारतात कॉर्मो जॉब्सला आपलं पेमेंट अॅप्लिकेशन गुगल पे (Google Pay) शी जोडलं आहे. भारतात हे जॉब स्पॉट कॉर्मो जॉब्स या रुपात उपलब्ध केले जाईल. गुगल ने हे अँप २०१८ साली बांगलादेशमध्ये लाँच केले आहे. यानंतर इंडोनेशियात देखील या अॅपचा विस्तार केला गेला आणि आता ते भारतात आणण्यात आले आहे.

कंपनीने असा दावा केला आहे की हे अँप गुगल पे द्वारे लाँच केल्यापासून झोमॅटो, डुंजोसह अनेक कंपन्यांनी यावर २० लाखांहून अधिक नोकऱ्यांच्या ऑफर पोस्ट केल्या आहेत.

हा अँप यूजर्सना केवळ एन्ट्री लेवलच्याच नोकऱ्या शोधण्यास मदत करणार नाही तर रेझ्युमे / सीव्ही बनवण्यास आणि नवी कौशल्ये शिकण्यासदेखील मदत करणार आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Job Search Now: Google launches new app in India

By Naukari Adda Team


Google's new app has been launched in India. This app will be very useful for finding entry level jobs.

Google Kormo App for Jobs Search in India: Now is the time to find a job without rushing. Google search engine has taken the initiative for this. Google has launched its job search application in India. The name of this job search app from Google is Kormo. Google claims that this app will be very useful for millions of young people in India to find entry level jobs.

According to TechCrunch, Google has linked Cormo Jobs in India with its payment application Google Pay. In India, these jobs will be available as Spot Cormo Jobs. Google has launched this app in 2018 in Bangladesh. The app was later expanded to Indonesia and is now available in India.

The company claims that since the app was launched by Google Pay, several companies, including Zomato and Dunjo, have posted more than 20 lakh job offers on it.

This app will not only help users to find entry level jobs but also create resumes / CVs and learn new skills.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda