ब्रेकिंग! 'एमपीएससी' परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक 'या' दिवशी करणार जाहीर

By Naukari Adda Team


ब्रेकिंग!

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आतापर्यंत तीनवेळा राज्य सेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. तत्पूर्वी, बुधवारी (ता. 26) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले. मात्र, या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थी संतापले असून त्यांनी ट्‌विटर वॉर सुरु केले आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोग सुधारित वेळापत्रक उद्या (गुरुवारी) जाहीर करणार आहे. 

 

ठळक बाबी... 

राज्य सेवा परीक्षेची शेवटची संधी असलेल्या परीक्षार्थींची संख्या लक्षणीय 
मार्च 2020 मध्ये आयोगाने तयार केल्या आहेत परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका 
संदर्भ बदलणार नाहीत, याची घेतली जातेय खबरदारी; उद्या (गुरुवारी) जाहीर होणार नवे वेळापत्रक 
आतापर्यंत तीनवेळा पुढे ढकलल्या परीक्षा; पूर्व परीक्षा याच वर्षी घेण्याचे आयोगाचे नियोजन 
परीक्षा पुढे ढकलल्याने बहुतांश विद्यार्थी संतापले; काहींना मिळाला दिलासा 
पुढील वर्षीपासून परीक्षार्थींना ऍपच्या माध्यमातून कागदपत्रे अपलोड, शंका निरसन, कॉल सेंटर होणार उपलब्ध 
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवेची पूर्व परीक्षा घेण्यासाठी मार्च 2020 मध्ये उत्तरपत्रिका तयार केल्या आहेत. मात्र, परीक्षा सतत पुढे ढकलल्या जात असल्याने त्यातील काही प्रश्‍नांचे संदर्भ बदलतील, असा पेच आयोगासमोर निर्माण झाला आहे. तर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रियांमुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुधारीत वेळापत्रक तत्काळ जाहीर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्याचेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, काहींना वाटू लागले आहे की यंदा परीक्षाच होणार नाहीत, काहींना वय संपुष्टात येण्याची चिंता लागली आहे. परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय अंगलट येऊ नये म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाने सावध पवित्रा घेतल्याचीही चर्चा आहे. आता आयोगाने सुधारीत वेळापत्रक तयार करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तत्पूर्वी, आयोगाने परीक्षा केंद्रांचा आढावा घेऊन त्याठिकाणी सॅनिटायझिंगसह अन्य कामांसाठी निवीदाही काढली आहे. परीक्षा सर्व नियमांचे काटेकोर पालन करुनच होतील, असेही आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Breaking! MPSC will announce the revised schedule of examinations on this day

By Naukari Adda Team


Solapur: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has so far postponed the pre-examination of state service three times due to increasing corona infection. Earlier on Wednesday, Social Justice Minister Dhananjay Munde asked Chief Minister Uddhav Thackeray to postpone the commission's examination. Accordingly, the Chief Minister tweeted that the examination has been postponed. However, the decision has angered most students, who have started a Twitter war. Against this backdrop, the commission will announce the revised schedule tomorrow (Thursday).

Highlights ...

The number of candidates with last chance of State Service Examination is significant
Examination question papers have been prepared by the Commission in March 2020
Care is taken not to change the context; The new schedule will be announced tomorrow (Thursday)
Exams postponed three times so far; Commission plans to conduct pre-examination this year
The postponement of the exam angered most of the students; Some were relieved
From next year, the examinees will be able to upload documents, resolve doubts and call center through the app

Maharashtra Public Service Commission has prepared answer sheets in March 2020 for pre-examination of State Service. However, as the exams are constantly being postponed, the context of some of the questions will change. Senior sources said that due to the angry reactions of the students, the Chief Minister's Office has instructed them to announce the revised schedule immediately. Meanwhile, some are worried that the exams will not be held this year, while others are worried about the end of the age. There is also talk that the Chief Minister's Office has taken precautionary measures so that the decision to postpone the examination is not overturned. Now, the commission has started preparations to prepare a revised schedule, which will be announced in consultation with experts. Earlier, the commission reviewed the examination centers and issued tenders for other works including sanitizing. The examinations will be conducted in strict compliance with all the rules, senior sources in the commission said.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda