ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात ! विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देता येईल यासाठी प्रयत्न

By Naukari Adda Team


ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात ! विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देता येईल यासाठी प्रयत्न, Final year exams begin in the first week of October! Efforts are being made to allow students to take the exam from home

मुंबई, दि. ३१ : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी  घराबाहेर न जाता घरी बसूनच परीक्षा देता यावी अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत झूमच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक झाली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना परीक्षा केंद्रावर  जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी काळजी करू नये. या परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व विद्यापीठ परीक्षेचे आयोजन करून निकाल जाहीर करतील असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवरील कोविड-१९ चा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त दि. १० नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केल्या.

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधी व न्याय विभाग आणि ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

बैठकीत परीक्षा किती तारखेपर्यंत घेऊ शकतो, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, परीक्षेची तारीख कोणती असावी, निकालाची तारीख कोणती असावी, परीक्षा पद्धत कशी असावी आदी विविध विषयांवर कुलगुरू यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

परीक्षा पद्धती संदर्भात गठीत केलेल्या समितीची बैठक बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी होईल त्यानंतर उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५:०० वाजता बैठक होईल.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Final year exams begin in the first week of October! Efforts are being made to allow students to take the exam from home

By Naukari Adda Team


Mumbai, dt. 31: On the background of Kovid-19, considering the mental and health of the final year students of the university and college, the examination system is being planned in such a way that the students can sit for the examination without going out of the house, said Higher and Technical Education Minister Uday Samant here today. An online meeting was held through Zoom with the chairman, members and vice-chancellors of all non-agricultural universities formed under the chairmanship of Higher and Technical Education Minister Uday Samant at the ministry.
Higher and Technical Education Minister Uday Samant said that a decision has been taken to take care of the health of the students so that they do not have to go to the examination center. So students and parents should not worry. The exams will start in the first week of October. Students will have enough time to study for the exam. Higher and Technical Education Minister Uday Samant said that in October, all universities will conduct examinations and announce the results as per the guidelines of the University Grants Commission (UGC).

All the procedures including the results of the final year examinations of the universities should be completed by 31st October 2020 and the universities which are experiencing the emergence of Kovid-19 at the local level or technical difficulties should submit their results by the maximum date. Higher and Technical Education Minister Uday Samant suggested that it should be completed by November 10, 2020.

Higher and Technical Education Minister Uday Samant said the decision would be announced soon in consultation with the Law and Justice Department and the Advocate General considering the University Grants Commission's guidelines on ATKT students' exams.

During the meeting, detailed discussions were held with the Vice-Chancellor on various issues such as the date of examination, online or offline, date of examination, date of result, method of examination etc.

The meeting of the committee formed regarding the examination system will be held on Wednesday. The meeting will be held on September 2, 2020 in the morning followed by a meeting at 5:00 pm in the presence of the Minister of Higher Technical Education.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda