१५ सप्टेंबरपर्यंत RTE प्रवेशांना मुदतवाढ!

By Naukari Adda Team


१५ सप्टेंबरपर्यंत RTE प्रवेशांना मुदतवाढ!, RTE admissions extended till September 15!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्यामुळे आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला खीळ बसली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ३१ आॅगस्टपर्यंत मुदत देऊनही आरटीईअंतर्गत अपेक्षित प्रवेश होऊ न शकल्याने आता प्रवेशनिश्चितीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ म्हणजे आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यंदा प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज मागवून १७ मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली. दरम्यान, राज्यात आरटीईच्या ९,३३१ शाळांमध्ये एकूण १ लाख १५ हजार ४६० जागा असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ ५३,६८७ जागांवर प्रवेश निश्चित होऊ शकले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थी-पालकांसह मूळ गावी स्थलांतरित झाल्यामुळे प्रवेशनिश्चितीसाठी ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुदतवाढीचा निर्णय घेतल्याची महिती आरटीई समन्वयकांनी दिली. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मात्र, यामुळे प्रवेशासाठी आणखी ताटकळत बसावे लागेल.

 

असे होतील प्रवेश
शाळांनी दिलेल्या तारखांनुसार शाळेत गर्दी होणार नाही, याची काळजी घेऊन पालकांनी विद्यार्थ्यांची प्रवेशनिश्चिती करायची आहे. प्रत्यक्ष शाळेत जाणे शक्य नसल्यास आवश्यक कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलद्वारे शाळांना पाठवून तात्पुरते प्रवेश घेण्याची मुभा आहे. ज्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली नाही, त्या पालकांशी संपर्क साधून प्रवेशनिश्चिती करण्यास सांगण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.

शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने 31 ऑगस्ट ही मुदत निश्चित‌ केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये शाळा मिळाली आहे, त्यांच्या पालकांना या तारखेपर्यंत शाळेत प्रवेश घ्यायचा आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी यासंबंधी म्हटले आहे, की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत 17 मार्च‌ रोजी काढण्यात आली असून, ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लॉटरी लागली आहे. त्यांनी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे.

“प्रवेशासाठी निश्चित‌ केलेल्या मुदतीनंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 31 ऑगस्टनंतर वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे, त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रति घेऊन संबंधित शाळेत 31 ऑगस्टपूर्वी जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा,” असे जगताप म्हणाले.

 

पालकांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास ई-मेलद्वारे, कागदपत्रे शाळेस पाठवून तसेच दूरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करुन पालकांनी प्रवेश निश्चित करावा. तसेच शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे, त्यातील शाळेत प्रवेशासाठी अद्याप न आलेल्या बालकांच्या पालकांना दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क करुन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही मुदतीत पूर्ण करण्यात यावी, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

RTE Admission 2020 – 2021 –   आपणास माहीतच आहे शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार शाळांमध्ये 25 टक्के प्रवेशासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत. आताच प्राप्त बातमी नुसार दोन ते तीन दिवसांत आरटीई प्रवेशाला राज्यात सुरुवात होणार आहे. निवड झालेल्या राज्यातील 1 लाख 920 विद्यार्थ्यांपैकी 17 मार्चला काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये 75 हजार 465 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाचे संदेश पाठविण्यात आले होते.

राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीईसाठी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेशासाठी राज्यातून 1 लाख 920 पाल्यांची निवड केली. तरीही 75 हजार 465 पाल्य प्रतीक्षा यादीत आहेत. नागपूरमधून 6 हजार 784 जागांसाठी 31 हजार 44 पालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 6 हजार 685 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 17 मार्चला सोडत निघाल्यावर 21 मार्चपासून देशभरात टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हापासून आरटीईच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे सोडतीत नाव आलेल्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

 

दुसरीकडे सीबीएसई आणि काही नामवंत खासगी इंग्रजी शाळांमार्फत पालकांना संदेश पाठवून प्रवेशाचा हप्ता भरण्याची सूचना केली आहे. या प्रकाराने नेमका कुठे प्रवेश घ्यायचा हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे पालक दुहेरी पेचात आहे. आज, राज्य सरकारने यावर निर्णय घेत, सूचना जाहीर केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

प्रवेश प्रतिबंध हटल्यावरच
राज्यात आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मात्र, राज्यातील ज्या शहरांतील वस्त्या कोरोनामुळे प्रभावित झाल्या आहेत, त्या क्षेत्रातील शाळांमध्ये प्रतिबंद हटल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

१७ मे २०२० – RTE प्रवेशाची पहिली सोडत काही दिवसांपूर्वी निघाली. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होणे अपेक्षित होते. परंतु लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया ठप्प झाली. परिणामी प्रवेशाचा पुढील टप्पा कधी पुर्ण होणार आणि विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित कधी होणार, अशा संभ्रमात सध्या पालक आहेत.

या प्रवेश प्रक्रियांत पुढील पॉल कधी उचलले जाणार असा प्रश्न पालकांना पडला आहे. सध्या लॉकडाऊन मुळे सर्व प्रक्रिया थांबल्या आहेत. त्यामुळे सध्या पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशाची चिंता सतावत आहे.

तसेच सध्या राउंड १ झाला असला तरी पुढील राउंड कधी होणार आणि त्याची सोडत कधी राहील इत्यादी प्रश्न सध्या पालकांना सतावत आहेत. परंतु प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालकांनी सांगितले आहे कि, पालकांनी काळजी करू नये, लॉक डाऊन नंतर प्रवेश प्रक्रिया  सुरळीतपणे सुरु होणार आहे.

 

25 टक्के आरक्षणानुसार प्रवेशाची सद्यस्थिती :
जिल्हा : शाळा : राखीव जागा : आलेले अर्ज : पहिल्या सोडतीत निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

1) पुणे : 972 : 16,949 : 62,919 : 16,617)1
2) नगर : 396 : 3,541 : 7,065 : 3,382
3) औरंगाबाद : 584 : 5,073 : 16,587 : 4,914
4) नाशिक : 447 : 5,557 : 17,630 : 5,307


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


RTE admissions extended till September 15!

By Naukari Adda Team


Due to the closure of schools in the state due to corona, 25 per cent admission process under RTE has been hampered. Despite the deadline of August 31 from the Directorate of Primary Education, the expected admission under RTE could not be granted and now the deadline for admission has been extended till September 15.
The Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 means that under RTE, 25 per cent seats in private non-subsidized schools are reserved for deprived and vulnerable boys / girls. This year, the lottery was drawn on March 17 by inviting online applications for admission. Meanwhile, there are a total of 1 lakh 15 thousand 460 seats in 9,331 RTE schools in the state, out of which only 53,687 seats have been secured so far.
They are not available for admission as many students and parents have migrated to their native villages due to the outbreak of corona. Therefore, the RTE coordinators informed that they have decided to extend the term. Students on the waiting list, however, will have to wait even longer for admission.

This will be the admission
Parents have to ensure the admission of students, taking care that the school will not be crowded as per the dates given by the schools. If it is not possible to go to the actual school, temporary admission is allowed by sending the required documents to the schools through WhatsApp and e-mail. Schools have been instructed to contact the parents of those who have not completed the admission process and ask them to confirm the admission.

According to the Right to Education Act, the school education department has fixed August 31 as the deadline for admission to 25 per cent seats in private schools. Parents of students who have received schooling in the draw are required to enter the school by this date.

Dattatraya Jagtap, Director, Primary Education, said that under the Right to Free and Compulsory Education Act, 25 per cent of the admissions process is being conducted online across the state every year. The draw was held on March 17 and the students who have won the lottery under RTE. He wants to go to the school till August 31 to confirm the admission.

Care should be taken to ensure that no child who has won the lottery is admitted after the stipulated time for admission. Students on the waiting list after August 31 will be given priority for the admission process. Also, parents should not rush to the verification committee considering the outbreak of corona virus. Parents of children who have won the lottery should go to the concerned school before August 31 with their original documents and photocopies to ensure their child's admission, ”said Jagtap.

If it is not possible for the parents to go to the school to confirm the admission, the parents should confirm the admission by sending the documents to the school by e-mail and also by contacting the headmaster of the school by telephone. The schools should also contact the parents of the children who have not yet come to the school from the list they have received on the RTE portal by phone, e-mail and complete their admission process on time, Jagtap said.

RTE Admission 2020 - 2021 - As you may know, the State Directorate of Primary Education has issued guidelines for 25 per cent admission in schools under the Right to Education Act. According to the latest news, RTE admission will start in the state in two to three days. Out of 1 lakh 920 students in the selected state, a waiting list of 75 thousand 465 students was announced in the draw held on March 17. Admission messages were sent to all these students.

The registration process for RTE has been underway across the state since February. 1 lakh 920 children were selected from the state for admission. Still, 75,465 children are on the waiting list. From Nagpur, 31 thousand 44 parents have registered for 6 thousand 784 seats. Out of which 6 thousand 685 students were selected. After leaving on March 17, a nationwide lockout was declared from March 21. Since then, no decision has been taken by the government on the RTE process. So there was an atmosphere of anxiety among the parents who were named in the draw.

On the other hand, CBSE and some reputed private English schools have instructed parents to pay the admission fee by sending a message. In this way, the question before them is exactly where to enter. So the parents are in a double whammy. Today, parents are relieved that the state government has decided to issue a notice.

Only after access restriction is lifted
The admission process of RTE will be started in the state. However, the directorate has clarified that in the cities in the state where settlements have been affected by the corona, admission will not be granted to schools in the area unless the ban is lifted.

May 17, 2020 - The first drop of RTE admission started a few days ago. The documents were then expected to be verified. But the lockdown caused the process to stall. As a result, parents are currently in a dilemma as to when the next phase of admission will be completed and when the admission of students will be confirmed.

Parents are left wondering when the next Paul will be picked up in this admission process. Currently all processes are stopped due to lockdown. So parents are currently worried about their child's access.

 

Also, even though Round 1 has taken place now, the parents are worried about when the next round will take place and when it will be released. But the director of the Department of Elementary Education has said that, parents should not worry, the admission process will start smoothly after the lockdown.

Admission status with 25% reservation:
District: School: Reserved seats: Applications received: Number of students selected in the first draw

1) Pune: 972: 16,949: 62,919: 16,617) 1
2) City: 396: 3,541: 7,065: 3,382
3) Aurangabad: 584: 5,073: 16,587: 4,914
4) Nashik: 447: 5,557: 17,630: 5,307

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021