कश्या घेतल्या जाणार कोरोना पदवी परीक्षा ! जाणून घ्या

By Naukari Adda Team


कश्या घेतल्या जाणार कोरोना पदवी परीक्षा ! जाणून घ्या, How to take Corona degree exam! Find out

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना कोणत्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायचे, वाचा..

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक असणार आहे. तसेच गरज भासल्यास विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर पुरविणे ही जबाबदारी शिक्षणसंस्थांची असणार आहे, अशा महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना बुधवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने विद्यापीठ आणि शिक्षणसंस्थांसाठी जारी केल्या आहेत. याशिवाय वय अधिक असलेले प्राध्यापक, गर्भवती कर्मचारी, प्राध्यापक, आजारांची पार्श्वभूमी असलेले कर्मचारी आणि प्राध्यापक यांना परीक्षा केंद्रावर काम देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

महत्त्वाच्या सूचना

– जास्त गर्दी होणार नाही अशा प्रकारे आसन व्यवस्थेचे नियोजन करावे.
 जागोजागी साबण, सॅनिटायझर, मास्क आदींची उपलब्धता करून द्यावी.
– विद्यार्थ्यांनी स्वत:चे मास्क, पाण्याची बाटली, सॅनिटायझर, ओळखपत्र बाळगावे.
– शिस्तीचे पालन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ पुरवावे.
– आवश्यक त्या वर्गखोल्या उपलब्ध करून द्याव्यात.
– संस्थांनी वाहतूक व्यवस्था उपलब्ध केल्यास त्यासाठी सॅनिटाझ केलेल्या गाड्या वापराव्या
– केंद्रावर थर्मल स्क्रीनिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
 एखाद्या विद्यार्थ्याला करोनाची लक्षणे असतील, तर त्याला जवळील आरोग्य केंद्रातून परीक्षा देण्याची सुविधा द्यावी.
 ये-जा करण्यासाठी पुरेसे मार्ग उपलब्ध असावेत.
– केंद्रांचे सातत्याने सॅनिटायझेशन करावे.

– केंद्रावर आल्यानंतर कोणाला लक्षणे आढळल्यास त्यांचे विलगीकरण करावे.
आरोग्य सेतू अॅप बंधनकारक

परीक्षा केंद्रावर जाताना प्रत्येक विद्यार्थ्याकडे आरोग्य सेतू अॅप असणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसेल, अशांना यातून सवलत देण्यात येणार आहे. याचबरोबर परीक्षा केंद्रांवर थुंकणे, सुरक्षित वावराचे नियम न तोडण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा;विद्यार्थ्यांची घरातूनच परीक्षा?
मुंबई : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता यावी, अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत राज्यातील कुलगुरूंचेही एकमत झाले आहे. त्यानुसार परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येणार आहे. या परीक्षा ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येतील. परीक्षा कोणत्या पद्धतीने होतील, याचा निर्णय बुधवारी (ता.2) जाहीर होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत झूमच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत परीक्षा किती तारखेपर्यंत घेऊ शकतो, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, परीक्षेची तारीख किती असावी, निकालाची तारीख किती असावी, परीक्षा पद्धत कशी असेल, अशा विविध विषयांवर कुलगुरू यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. अमरावती व यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने परीक्षा सुरू करून निकालाची वेळ नोव्हेंबरपर्यंत असावी, अशी भूमिका मांडली आहे. तर उर्वरित 11 विद्यापीठांनी परीक्षा घेण्यासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. विद्यापीठांना वेळापत्रक निश्‍चित करण्यासाठी आणखी एक दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर परीक्षा पद्धतीसंदर्भात गठीत केलेल्या समितीची बैठक बुधवारी (ता.2) सकाळी होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक घेउन परीक्षे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय युजीसीला कळविण्यात येणार असल्याचे, सामंत म्हणाले.

 

31 ऑक्‍टोबरपर्यंत विद्यापीठांनी अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त 10 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सामंत यांनी यावेळी केल्या.

 – 31 ऑक्‍टोबर 2020 पर्यंत परीक्षा आणि निकालासह संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार
  अडचणी असणाऱ्या विद्यापीठांना 10 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार
 – राज्यातील 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थी देणार परीक्षा
 – परीक्षेचा पर्याय निवडण्याचे अधिकार कुलगुरूंना
 एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णयही लवकरच

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधी व न्याय विभाग आणि ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. यानंतर या परीक्षांचा निर्णयही लवकरच जाहीर करण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


How to take Corona degree exam! Find out

By Naukari Adda Team


Read the important guidelines to follow while taking the final year exam.

It will be mandatory to keep a distance of six feet between the two students while taking the final year exams. It will also be the responsibility of the educational institutions to provide masks and sanitizers to the students if required, such important guidelines were issued by the Union Ministry of Health and Family Welfare on Wednesday. In addition, it has been clarified that professors who are older, pregnant staff, professors, staff with a background of illness and professors should not be allowed to work at the examination center.

Important Notice

- Seating should be planned in such a way that there will not be too much crowd.
Soaps, sanitizers, masks etc. should be made available everywhere.
- Students should carry their own mask, water bottle, sanitizer, identity card.
- Provide adequate manpower to enforce discipline.
- Necessary classrooms should be made available.
- Sanitized vehicles should be used for transportation if the organization provides transportation system
- Thermal screening facility should be provided at the center.
If a student has symptoms of corona, he should be given the facility to take the exam from the nearest health center.
There should be enough ways to get around.
- Centers should be continuously sanitized.

- If anyone finds symptoms after coming to the center, they should be isolated.
Health bridge app binding

It has been clarified that it is mandatory for every student to have a health bridge app while visiting the examination center. Students who do not have a smartphone will be given a discount. It has also been clarified that spitting at the examination centers and not breaking the rules of safe conduct.

Exams in the first week of October; Exams for students at home?
Mumbai: An examination system is being planned so that final year students can sit for the exam at home. The Vice-Chancellor of the state has also agreed on this. Accordingly, students will be given ample time to study for the exam. The exams will start in the first week of October. The decision on the manner in which the examinations will be conducted will be announced on Wednesday, said Higher and Technical Education Minister Uday Samant.

Under the chairmanship of Higher and Technical Education Minister Uday Samant, an online meeting was held at the Ministry with the Vice Chancellors of all non-agricultural universities through Zoom. During the meeting, various issues were discussed in detail with the Vice-Chancellor on the date till which the examination can be held, whether the examination is online or offline, what should be the date of the examination, what should be the date of result, what should be the examination method. Amravati and Yashwantrao Chavan Universities have started the examination and the result should be till November. The remaining 11 universities have asked the state government to extend the deadline till October 31. Universities have been given one more day to fix the schedule. After that, the meeting of the committee formed regarding the examination system will be held on Wednesday (2nd) morning. After that, an emergency management meeting will be held in the presence of the Chief Minister and a decision will be taken to conduct the examination. The decision will be communicated to the UGC, Samant said.

By October 31, universities must complete all procedures, including the results of the final semester exams. Samant suggested that universities which have experienced corona outbreaks or technical problems at the local level should complete their results process by November 10 at the latest.

- The entire process including examination and result will be completed by 31st October 2020
Universities with difficulties will have to complete the process by November 10
- 7 lakh 92 thousand 385 students in the state will take the exam
- The right to choose the option of examination to the Vice-Chancellor
The decision of the examination of ATKT students will also be taken soon

Discussions will be held with the Department of Law and Justice and the Advocate General considering the guidelines of the University Grants Commission regarding the examination of ATKT students. After this, the decision of these examinations will be announced soon, said Samant.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021