शहरातील श्रमिकांना मिळणार रोजगार हमी अंतर्गत काम

By Naukari Adda Team


शहरातील श्रमिकांना मिळणार रोजगार हमी अंतर्गत काम , City workers will get jobs under the employment guarantee

नवी दिल्ली : शेतीच्या कामात गुंतलेल्या श्रमिकांवर; करोना संसर्ग आणि लॉकडाउन यांचा फटका बसल्यामुळे शहरी भागांत काम करणारे श्रमिक मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाले आहेत. शेतीच्या कामात गुंतलेल्या श्रमिकांवर; तसेच शेतकऱ्यांवर उपासमारीची तेवढी वेळ आलेली नाही. परंतु, दैनंदिन मोबदल्यावर अवलंबून असणारा किंवा छोट्या-मोठ्या नोकऱ्या करणारा श्रमिक मोठ्या प्रमाणावर रोजगाराला मुकला आहे. या श्रमिकांना त्यांचा रोजगार पुन्हा मिळावा किंवा उत्पन्नाचा स्रोत त्यांच्यासाठी निर्माण व्हावा, यासाठी केंद्र सरकार आपली महत्त्वाकांक्षी रोजगार योजना आता शहरांतही राबवणार आहे. ही माहिती केंद्रीय गृह व नगर व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव संजय कुमार यांनी दिली आहे.

शहरांतून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसारखी योजना राबवण्यात येणार आहे. ही योजना मंजूर झाल्यास ती देशातील छोट्या शहरांत प्रथम राबवली जाईल. या योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शहरांतही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एखादी योजना राबवण्याचा सरकार गेल्या वर्षापासूनच विचार करीत होते. करोना संसर्गामुळे त्याला अधिकच पुष्टी मिळाल्याचे संजयकुमार म्हणाले. या वर्षी केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागांत रोजगार निर्माण करण्यासाठी एक लाख कोटींहून अधिक रक्कम खर्च केली आहे. या अंतर्गत दुर्गम भागात राहणाऱ्या श्रमिकांनाही वर्षातून किमान शंभर दिवसांचा रोजगार मिळेल आणि त्यायोगे त्यांना दर दिवसाला २०२ रुपये मोबदला मिळेल, अशी व्यवस्था सरकारने केली आहे. याच योजनेचे शहरी रूप लागू होईल; त्या वेळी करोना विषाणूमुळे रोजगार गमवावा लागलेल्या शहरी नागरिकांसाठी ही योजना आणखी व्यापक केली जाईल.

राष्ट्रीय स्तरावरील शहरी रोजगार हमी योजनेची सुरुवात छोट्या शहरांपासून केली जाणार आहे. मोठ्या शहरातींल प्रकल्पांना व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित मनुष्यबळ लागत असल्यामुळे मोठ्या शहरांत ही योजना राबवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहे. त्यामुळेच ही योजना छोट्या शहरांतून सुरू करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.

शहरांत स्थिती गंभीर
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकच्या मते, भारतातील शहरांत कोव्हिड-१९ (करोना) संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामुळे रोजगारही मोठ्या प्रमाणावर गेले आहेत. याचा परिणाम म्हणून बेरोजगार श्रमिकांचा नवा वर्ग उदयाला आला आहे. या वर्गाला करोनाने दारिद्र्यात ढकलले आहे. 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी' (सीएमआयई) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात १२.१ कोटी लोकांना रोजगाराला मुकावे लागले. यामुळे बेरोजगारीचा दर २३ टक्के झाला. मात्र, लॉकडाउनंतर काही प्रमाणात अर्थव्यवस्था खुली झाल्यामुळे आता बेरोजगारीचा दर घसरत आहे.

ग्रामीण भागात रोजगार
ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक पातळीवरील प्रकल्पांतून लोकांना रोजगार दिला जातो. यामध्ये रस्ते बांधणी, विहिरी खोदणे, वनीकरण अशा प्रकल्पांचा समावेश होतो. सध्या या योजनेअंतर्गत देशाच्या ग्रामीण भागातील सुमारे २७ कोटी लोकांना रोजगार दिला जात आहे. या योजनेचा उपयोग लॉकडाउन काळात शहरांतून गावांकडे स्थलांतरित झालेल्या श्रमिकांना रोजगार देण्यासाठीही होत आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


City workers will get jobs under the employment guarantee

By Naukari Adda Team


New Delhi: On agricultural laborers; The impact of the corona infection and lockdown has left a large number of workers in urban areas unemployed. On laborers engaged in agricultural work; Also, there is not much time of famine on the farmers. However, a large number of workers who depend on daily wages or do small-scale jobs have lost their jobs. To help these workers regain their jobs or create a source of income for them, the central government will now implement its ambitious employment scheme in the cities as well. This information has been given by Sanjay Kumar, Joint Secretary, Ministry of Home Affairs and Urban Affairs.

Schemes like National Rural Employment Guarantee Scheme will be implemented in cities. If approved, the scheme will be implemented first in small towns across the country. The scheme is expected to cost Rs 35,000 crore. The government has been considering implementing a scheme similar to the National Rural Employment Guarantee Scheme in cities since last year. Sanjay Kumar said that he got more confirmation due to corona infection. This year, the central government has spent over Rs 1 lakh crore to create employment in rural areas under the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme. Under this, workers living in remote areas will also get employment for at least 100 days in a year and will be paid Rs. 202 per day. The urban form of the same scheme will apply; The scheme will be further expanded for urban citizens who lost their jobs due to the corona virus at that time.

The national level Urban Employment Guarantee Scheme will be launched in small towns. Since projects in big cities require professionally trained manpower, separate efforts will have to be made to implement the scheme in big cities. That is why the scheme will be launched in small towns, Kumar said.

The situation in the cities is critical
According to the London School of Economics, life in Indian cities has been disrupted by the Covid-19 (Corona) infection. This has also led to a large loss of employment. As a result, a new class of unemployed workers has emerged. This class has been pushed into poverty by Corona. According to figures released by the Center for Monitoring Indian Economy (CMIE), 12.1 crore people lost their jobs in April. As a result, the unemployment rate rose to 23 percent. However, the unemployment rate is now falling as the economy has opened up to some extent after the lockdown.

Employment in rural areas
Under the Rural Employment Guarantee Scheme, employment is provided to people through local level projects. These include projects like road construction, digging wells, afforestation. At present, about 27 crore people in rural areas of the country are being provided employment under this scheme. The scheme is also being used to provide employment to migrant workers from cities to villages during the lockdown.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda