आता (SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये होणार बंपर भरती

By Naukari Adda Team


आता (SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये  होणार बंपर भरती , Now (SBI) State Bank of India will have bumper recruitment

स्टेंट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मोठी भरती काढणार असून पुढील तीन महिन्यांत 14000 जागा भरल्या जाण्याची शक्यता  आहे. एसबीआय (SBI) ने आजच 30000 जुन्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर ही भरती केली जाणार आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.एसबीआयकडून स्वेच्छानिवृत्ती योजनेवर काम सुरू आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत एसबीआयच्या कर्मचाऱ्यांची संख्या २.४९ लाख इतकी होती. त्यातील ३० हजार १९० कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी घरी बसावं लागू शकतं. व्हीआरएससाठी एक आराखडा तयार करण्यात आला असून तो बोर्डाची मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. ३० हजारांमध्ये ११ हजार ५६५ अधिकारी आणि १८ हजार ६२५ कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. याआधी २००१ मध्ये एसबीआयनं व्हीआरएस योजना आणली होती.

यामुळे या कर्मचाऱ्यांच्य़ा रिक्त जागांवर हे ताज्या दमाचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. ‘ऑन टॅप व्हीआरएस’ ही योजना स्टेट बँकेत लागू होण्याची शक्यता आहे. एसबीआयही कर्मचारी फ्रेंडली आणि विस्तार करणार असल्याने पुढील काळात १४००० जागांवर भरती केली जाणार आहे, असे स्टेट बँकेतील सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ३१ मार्च २०२० रोजी २.४९ लाख इतकी आहे. हाच आकडा मार्च २०१९ मध्ये २.५७ लाख इतका होता. खर्च कमी करण्यासाठी एसबीआयनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन हजार कोटी रुपये वाचतील, असा बँकेचा अंदाज आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Now (SBI) State Bank of India will have bumper recruitment

By Naukari Adda Team


State Bank of India (SBI) is all set to recruit 14,000 vacancies in the next three months. SBI had today decided to give VRS to 30,000 old employees. This recruitment will be done against this background.

State Bank of India, the country's largest state-owned bank, is ready to provide coconuts to 30,000 employees. SBI is working on a voluntary retirement scheme. As on March 31, 2020, SBI had 2.49 lakh employees. Of these, 30,190 employees may now have to stay at home permanently. A blueprint for VRS has been prepared and is awaiting board approval. The 30,000 will include 11,565 officers and 18,625 employees. Earlier in 2001, SBI had introduced VRS scheme.

As a result, these freshman employees will be appointed to fill the vacancies. This was reported by ANI. The 'On Tap VRS' scheme is likely to be implemented at SBI. As SBI will also be staff-friendly and expand, 14,000 vacancies will be filled in the near future, SBI sources said.

The total number of SBI employees as on March 31, 2020 is 2.49 lakh. The same figure was 2.57 lakh in March 2019. SBI has decided to cut staff to reduce costs. The bank estimates that this will save Rs 2,000 crore.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda