ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीनं होणार परीक्षा, मुंबई विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पॅटर्न जाहीर

By Naukari Adda Team


ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीनं होणार परीक्षा, मुंबई विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पॅटर्न जाहीर, Online multiple choice examination will be held, Mumbai University final year examination pattern announced

मुंबई: सर्व थिअरी परीक्षा ५० गुणांसाठी आणि एक तासाच्या कालावधीच्या असतील. मुंबई विद्यापीठानं पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. पदवी परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याचा पॅटर्न विद्यापीठानं दिला असून संलग्न महाविद्यालयांनी त्यानुसार परीक्षा घ्यायच्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नियमित थिअरी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत, तर बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून बहुपर्यायी पद्धतीनं होणार आहेत. 

 

मुंबई विद्यापीठानं परीक्षांच्या आयोजनासंदर्भात मंगळवारी मध्यरात्री परिपत्रक जारी केलं. क्लस्टर पद्धतीनं महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. म्हणजेच एक लीड महाविद्यालय आणि त्याअंतर्गत त्या परिसरातील ६ ते ७ विद्यालय अशी मिळून क्लस्टर्स असतील. या एका क्लस्टरमध्ये एका वेळी एका वेळापत्रकानुसार, परीक्षा होतील. प्रश्नपत्रिकाही क्लस्टरनिहाय असतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडून सूचना मिळतील.

सर्व थेअरी परीक्षा १३ मार्च २०२० पर्यंत महाविद्यालयात शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. सर्व थेअरी परीक्षा ऑनलाइन होतील. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील. परीक्षा ५० गुणांसाठी आणि १ तास कालावधीची असेल. ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक विषयाची थेअरी परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाने लगेचच मूल्यांकन प्रक्रिया सुरू करून विद्यार्थ्याचे गुण तयार करावेत, थेअरी परीक्षेचे मूल्यांकन हे ५० गुणांचे असल्यामुळे संबंधित विषयाच्या कमाल (६०, ७५, ८०, १०० इत्यादी) गुणांनुसार रुपांतर करून दोन दिवसांच्या आत विद्यापीठाच्या ऑनलाइन सिस्टिमध्ये अपलोड करावेत, अशा सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.

बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबर २०२० पासून सुरू कराव्यात, असे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. जर बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कॉलेजने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतल्या असतील, तर पुन्हा घेऊ नयेत.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Online multiple choice examination will be held, Mumbai University final year examination pattern announced

By Naukari Adda Team


Mumbai: All theory exams will be for 50 marks and one hour duration. Mumbai University has issued an important circular regarding degree examinations. The university has given a pattern of how to conduct degree examinations and the affiliated colleges want to conduct examinations accordingly. According to the guidelines of Mumbai University, regular theory exams will be held from October 1 to 17, while backlog exams will be held from September 25 in a multiple choice manner.

Mumbai University issued a circular on Tuesday midnight regarding the organization of examinations. Examinations will be conducted at the college level in cluster system. This means that there will be one lead college and 6 to 7 schools in the area. In this one cluster, examinations will be held one at a time, according to the schedule. Question papers will also be cluster wise. Students will receive instructions from their college.

All the theory exams will be based on the syllabus taught in the college till March 13, 2020. All theory exams will be online. There will be multiple choice questions (MCQ). The exam will be for 50 marks and will last for 1 hour. Each college should start the assessment process immediately after the theoretical examination of each subject online and prepare the marks of the student. , Such instructions have been given by the university to the colleges.

The university has directed the colleges to start the backlog examination from September 25, 2020. If the college has taken the backlog student exams in February-March 2020, then it should not be taken again.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda