करोनानंतर राज्यात शंभर टक्के प्राध्यापक भरती

By Naukari Adda Team


करोनानंतर राज्यात शंभर टक्के प्राध्यापक भरती, One hundred percent professor recruitment in the state after Corona

करोनाच्या स्थितीमुळे राज्यातील भरती प्रक्रियेवर सध्या स्थगिती आहे. याचा फटका सहाय्यक प्राध्यापक भरतीलाही बसला आहे. मात्र, ही स्थगिती कायमस्वरूपी नसून करोनानंतर सर्वकाही पूर्वपदावर येताच वरिष्ठ महाविद्यालयांमधील शंभर टक्के सहाय्यक प्राध्यापक भरती केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नागपुरात दिले.

Shikshak Bharti 2020
राज्यातील महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के प्राध्यापक पदभरती सुरू करावी, अशी मागणी हजारो नेट, सेट, पीएच.डी. पात्रताधारकांच्या संघटनांनी केली आहे. जर शासनाला प्राध्यापक पदभरती करणे शक्य नसेल तर राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालये शासनाने कायमस्वरूपी बंद करून टाकावी, अशी संतप्त मागणी या पात्रताधारकांनी केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आढावा घेण्यासाठी उदय सामंत नागपुरात आले असता पात्रताधारकांनी त्यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले. सध्या राज्यात अठरा ते वीस हजार सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. निवृत्त होणाऱ्या शिक्षकांमुळे दरमहिन्याला यात वाढ होत आहे. करोनामुळे शंभर टक्के पदभरती बंद आहे.

सन २०१५ मध्ये आर्थिक काटकसरीचे कारण देत मागील सरकारने प्राध्यापक पदभरती प्रक्रिया बंद केली होती. त्यामुळे पात्रताधारकांच्या अनेक संघटनांनी मोर्चा, आंदोलने, निवेदन देऊन प्राध्यापक पदभरती सुरू करण्याची मागणी केली. पात्रताधारकांचा वाढता रोष पाहून तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जाचक अटींसह ४० टक्के प्राध्यापक पदभरतीला मान्यता दिली होती. परंतु याच काळात मराठा आरक्षण व आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीय आरक्षण जाहीर झाल्याने बिंदूनामावली निश्चित करण्यात बराच वेळ निघून गेला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता करोनामुळे  भरतीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील पात्रताधारकांनी शिक्षक दिनी पदवी जलाव आंदोलनही केले.

मागण्या काय?

*    सहाय्यक प्राध्यापक पदाची पदभरती यूजीसीने ४ जून २०१९ रोजी काढलेल्या पत्रानुसार, १०० टक्के पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी.

शिक्षक भरतीसाठी खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी वयोमर्यादा लागू करण्यात आलेली होती.

पवित्र संके तस्थळाद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीसाठी खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी वयोमर्यादा लागू करण्यात आलेली होती. त्यामुळे वय जास्त असलेल्या अनेक उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत.

मात्र, आता महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम भरून देण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे

मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित न केलेल्या, आता नव्याने प्राधान्यक्रम देणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या समांतर आरक्षणाची (उदा. महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ) नोंद एकदाच करता येईल.

त्यामुळे समांतर आरक्षणामध्ये दुरुस्ती करता येणार नसल्याने उमेदवारांनी समांतर आरक्षणविषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. जून २०१९ मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित केलेल्या उमेदवारांनी  पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांना लॉगिन उपलब्ध होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाने पवित्र संके तस्थळाद्वारे दिली आहे.

*   यूजीसीच्या निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करण्यात यावी

*   सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व २०१५च्या शासन निर्णयानुसार विषयनिहाय आरक्षणानुसार पदभरती करावी

*    राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात प्रचलित आरक्षणानुसार बिंदूनामावलीमधील राखीव प्रवर्गातील इमाव, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाचा अनुशेष प्रथम भरण्यात यावा

*   तासिका तत्त्वावरील नेमणुका बंद करण्यात याव्या, शंभर टक्के प्राध्यापक भरती होईपर्यंत तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना समान काम समान वेतन लागू करण्यात यावे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


One hundred percent professor recruitment in the state after Corona

By Naukari Adda Team


The recruitment process in the state is currently on hold due to Corona’s condition. This has also hit the recruitment of assistant professors. However, the moratorium is not permanent and 100 per cent assistant professors in senior colleges will be recruited as soon as everything is back to normal, assured Uday Samant, Minister of State for Higher and Technical Education in Nagpur.

Shikshak Bharti 2020
Thousands of net, set, Ph.D. Qualified associations have done. If it is not possible for the government to recruit professors, then the senior colleges across the state should be closed permanently by the government. When Rashtrasant Tukdoji Maharaj Uday Samant came to Nagpur to inspect Nagpur University, the eligible persons met him and made various demands. Currently, there are 18,000 to 20,000 vacancies for assistant professors in the state. This is increasing every month due to retiring teachers. One hundred percent recruitment is closed due to Corona.

In 2015, the previous government had stopped the recruitment process on the grounds of financial austerity. Therefore, many organizations of eligible candidates staged rallies, agitations, and demanded the recruitment of professors. Seeing the growing anger of the eligible candidates, the then Higher Education Minister Vinod Tawde had approved the recruitment of 40 per cent professors in the run up to the Lok Sabha elections with many oppressive conditions. But with the announcement of Maratha reservation and economically backward class reservation in the same period, it took a long time to finalize the list of points. After that, the process could not be completed due to the code of conduct for the Lok Sabha elections. Recruitment is now banned due to corona. Therefore, the qualifiers in the state also started a degree burning agitation on Teachers' Day.

What are the demands?

* Recruitment for the post of Assistant Professor As per the letter issued by UGC on 4th June 2019, 100% recruitment should be started immediately.

An age limit was imposed for vacancies in private secondary and higher secondary schools for teacher recruitment.

An age limit was imposed for vacancies in private secondary and higher secondary schools for teacher recruitment conducted by Pavitra Sanke Tasthala. As a result, many older candidates have not been able to prioritize the selected institutions with interviews.

However, now as per the provisions of the Maharashtra Private School Staff (Conditions of Service) Rules, 1981, candidates will be given the opportunity to fill up the priority order between September 7 and 17.

Candidates who do not prioritize the selected institutions with interviews, now give new priority, will be able to register their parallel reservations (e.g. women, ex-servicemen, part-time, project-affected, earthquake-affected, players, orphans) only once.

Therefore, since parallel reservations cannot be amended, candidates are advised to carefully record parallel reservation information. Candidates who have given priority to the institutions selected with the option of interview in June 2019 do not need to re-prioritize. Therefore, the Department of Education has informed that the login will not be available to the concerned candidates.

* One hundred percent professors should be recruited as per the instructions of UGC

* As per the decision given by the Supreme Court and as per the ruling of 2015, recruitment should be done as per the subject wise reservation

* As per the prevailing reservation in the senior colleges in the state, the backlog of reserved category Imams, Scheduled Castes and Scheduled Tribes should be filled first.

* Appointments on Tasika principle should be stopped, equal pay for equal work should be applied to professors on Tasika principle till one hundred percent professors are recruited.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda