आता ‘महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना आता कौशल्य विकास प्रशिक्षण!

By Naukari Adda Team


आता ‘महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना आता कौशल्य विकास प्रशिक्षण!, Skill development training for those who register for

राज्यातील उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योग, कामगार विभागाच्यावतीने सुरू केलेल्या ‘महाजॉब्ज’ संकेतस्थळाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन लाख ८६ हजार जणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८,४०३ अकुशल नोकरीइच्छुक असून, त्यांना  प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडे वर्ग केले जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी येथे दिली.

महाजॉब्स’ संकेतस्थळाचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या वेळी उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नोकरी इच्छुकांना रोजगाराच्या उच्चतम शक्यता असणाऱ्या पणन अधिकारी, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टूल ऑपरेटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, ऑफिस असिस्टंट व मनुष्यबळ विकास आदी क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित केले जाईल.

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण  करण्यात आले आहे.  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा पार पडला. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पोर्टलची उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः
१) नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा.
२) निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.
३) उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे.
४) महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे.

संकेतस्थळावर अशी करा नोंदणी…
१.‘महाजॉब्स’ या http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावा.
२. प्रथम तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती भरा. त्यानंतर मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक मॅच झाल्यास तुमच्या नावाने नोंदणी होईल.
३. त्यानंतर तुमची शैक्षणिक संबंधित सर्व माहिती भरावयाची आहे.
४ .याबरोबरच तुम्ही एखाद्या कामामध्ये पारंगत, कुशल असल्यास तुमच्या कौशल्याविषयी माहितही देवू शकता.
५. त्यानंतर दिसत असलेला कॅपच्या (captcha) व्यवस्थित टाईप करा.
६. यानंतर सबमिट करा.
७ .तुम्ही नोंदणी करुन सबमिट केल्यानंतर ‘Registration done successfully’ असा मेसेज येईल.

ही कागदपत्रे अपलोड करावीत…
– महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) अपलोड करणे अनिवार्य आहे.
– शैक्षणिक प्रमाणपत्र
– कौशल्य प्रमाणपत्र
– फोटो

मदतीसाठी येथे संपर्क साधा…

महाजॉब पोर्टलसंबंधी कोणत्याही मदतीसाठी आपण आमच्या ग्राहक सेवा नंबरवर फोन करू शकता( ०२२-६१३१६४०५) किंवा ईमेल आयडी वर ईमेल करू शकता.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Skill development training for those who register for 'Mahajobs' now!

By Naukari Adda Team


The 'Mahajobs' website, launched by the Department of Industries and Labor to provide skilled manpower to industries in the state, is getting a huge response. So far, two lakh 86 thousand people have registered for the job. Out of them, 8,403 are unskilled job seekers and they will be shifted to the Skill Development and Entrepreneurship Department for training, Industry Minister Subhash Desai said here on Tuesday.

A meeting was held at the ministry on Tuesday under the chairmanship of Industries Minister Desai to review Mahajobs' website. Industry department officials were present at the time.

Job seekers will be trained in marketing officers, fitters, welders, machinists, tool operators, turners, electricians, office assistants and manpower development with the highest employment prospects.

Chief Minister Uddhav Thackeray has launched the web portal 'Mahajobs', which provides employment opportunities to local Bhumiputras in the state. Industry Minister Subhash Desai graced the occasion. This portal has been created with the objective of providing employment to the Marathi youth in the state.

Job seekers only need to upload their information on the Mahajobs portal. Once registered, job opportunities will be made available to aspirants from various companies.

The objectives of the portal are as follows:
1) The link between job seekers and entrepreneurs.
2) Reducing the gap between demand and supply of manpower in different types of skills.
3) To enable industries to function continuously.
4) To create permanent system for skilled manpower for industries in Maharashtra to get suitable local workers.

Register on the website
1. Go to the website 'Mahajobs' http://mahajobs.maharashtra.gov.in.
2. First fill in your name, mobile number, email id. This will be followed by the OTP number on the mobile or email ID. If that OTP number matches, you will be registered in your name.
3. Then you have to fill in all the information related to your education.
4. In addition, if you are skilled in a job, you can also give information about your skills.
5. Then type the captcha that appears.
6. Then submit.
7. After you register and submit, you will get the message 'Registration done successfully'.

These documents should be uploaded
- It is mandatory to upload the domicile of Maharashtra.
- Educational certificate
- Skills Certificate
- Photo

Contact here for help

For any help regarding Mahajob Portal you can call our customer service number (022-61316405) or email to email id.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda