आता राज्यात होणार मेगा पोलीस भरती

By Naukari Adda Team


आता राज्यात होणार मेगा पोलीस भरती , Now there will be mega police recruitment in the state

बीड : कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याचीही शक्यता आहे.

  1. कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तब्बल दहा हजार पोलिसांची भरती यातून होऊ शकणार आहे.

अनेक पोलिसांना कोविडची लागण झाल्याने पोलिसांचं पुरेसे संख्याबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. पोलीस भरतीबाबत सरकारने घोषणा केल्यास बेरोजगारीच्या संकटात अनेक तरुणांना दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात फक्त आरोग्य आणि वैद्यकीय विभागात भरती सुरू होती. आर्थिक अडचणींमुळे इतर विभागातील भरती प्रक्रिया सरकारने बंद केली होती. मात्र आता पोलीस भरतीला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता झाल्याने तरुणांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील पोलीस दलामध्ये विविध पदांवर जवळपास 12 हजार 538 पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात जुलै महिन्यात आल्या होत्या. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं.
पोलीस शिपाई गट-क संवर्गातील 2019 या भरती वर्षात रिक्त असलेली 5297 पदे व 2020 या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा मुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण सहा 6726 पदे त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 500 हून अधिक अशी एकूण 12 हजारा 538 पदे भरण्यात येतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी तेव्हा दिली होती.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Now there will be mega police recruitment in the state

By Naukari Adda Team


Beed: The lockdown in the wake of the Corona virus crisis has shaken the state's economy. Therefore, the state government had decided to stop the recruitment process in various sectors. But now, once again, the state has been given the green signal for mega police recruitment soon. A decision in this regard is also likely to be taken at the cabinet meeting.
A decision on police recruitment is likely to be taken at the cabinet meeting in view of the growing stress on the police during the Kovid period. It will be possible to recruit tens of thousands of policemen.
Many policemen are infected with covid and there is not enough police force available. So there are limits to maintaining law and order. Against this backdrop, it is learned that the state government has started a movement for police recruitment. If the government announces police recruitment, many youths will be relieved of the unemployment crisis. During the Corona period only recruitment in the health and medical departments was underway. The government had shut down the recruitment process in other departments due to financial constraints. But now that police recruitment is likely to get a green signal, the youth are relieved. The department was instructed in July to take immediate action for the recruitment of about 12,538 posts in the state police force. Home Minister Anil Deshmukh had said that the process would be completed by the end of December.
There are 5297 vacancies in the Police Recruitment Group-C category in the 2019 recruitment year and a total of six 6726 posts in the Recruitment, Retirement, Promotion, Resignation Police Recruitment, Police Peon Driver, Armed Police Peon category as well as Mira-Bhayander Vasai-Virar. Out of the 975 posts created in the first phase for the Commissionerate of Police, a total of 12,538 posts will be filled in the cadre of more than 500, said Anil Deshmukh at the time.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda