निकालाआधी पूर्ण करा ‘हे’ काम NEET २०२०

By Naukari Adda Team


निकालाआधी पूर्ण करा ‘हे’ काम NEET २०२० , Complete this work before the result NEET 2020

एम्स (AIIMS), जिपमर (JIPMER) सह देशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस आणि बीडीएस (MBBS/BDS) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट २०२० परीक्षा १३ सप्टेंबर रोजी पार पडली. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र निकालाआधी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीटसंबंधी एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यात विद्यार्थ्यांना निकालाच्या आधी एक महत्त्वाचं काम करण्यास सांगितले आहे.

 

कशाबद्दल आहे परिपत्रक?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षा संपताच विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याची एक संधी दिली आहे. जे विद्यार्थी १३ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या परीक्षेत सहभागी झाले होते, त्यांनी पुन्हा एकवार आपला नीट परीक्षा अर्ज पाहायचा आहे. जर त्यात कुठली दुरुस्ती करायची असेल तर ती आताच करायची आहे. कारण त्या अर्जातली माहितीच विद्यार्थ्यांना नीट निकालात असणार आहे.

कोणत्या रकान्यात करू शकता दुरुस्ती?
आईचे नाव
वडिलांचे नाव
लिंग
कॅटेगरी
पर्सन विथ डिसअॅबिलिटी
स्टेट कोड एलिजिबिलिटी
नॅशनॅलिटी

दुरुस्ती करण्यासाठी नीट संकेतस्थळावरील लिंक अॅक्टिव्ह करण्यात आली आहे. विद्यार्थी ३० सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जात दुरुस्ती करु शकतात. शुल्क जमा करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० रोजी रात्री ११.५० पर्यंतचा वेळ दिला गेला आहे.

 

पुन्हा भरावे लागणार का शुल्क?

परिपत्रकात असं म्हटलं आहे की अर्जात पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा शुल्क भरावे लागणार की नाही हे कुठल्या प्रकारची दुरुस्ती केली जाणार त्यावर ठरणार आहे. जर तुम्हाला कुठल्या अशा रकान्यात दुरुस्ती करायची आहे, ज्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यायचे आहे, तर ते तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे करू शकता.

ही चूक करू नका

एनटीए ने सांगितलं आहे की ईमेल, फॅक्स किंवा अन्य माध्यमांद्वारे अर्जात सुधारणा करण्यासंबंधी कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. ही प्रक्रिया तुम्हाला स्वत: वेबसाइटला भेट देऊन पूर्ण करायची आहे.

 

एनटीएचे परिपत्रक वाचण्यासाठी  

Click here to see the ad

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Complete this work before the result NEET 2020

By Naukari Adda Team


Exams for admission to MBBS and BDS courses in various medical colleges across the country, including AIIMS, JIPMER, passed the 2020 exam on 13th September. Students who took this exam are now awaiting the results. But before the verdict, the National Testing Agency has issued an important circular regarding the net. This circular has been issued on the official website ntaneet.nic.in. It asks students to do an important task before the result.

What is the circular about?

The National Testing Agency has given students a chance to amend the application as soon as the exam is over. Students who participated in the exam held on September 13, 2020, want to check their exam form once again. If there is any correction to be made in it, it has to be done now. Because the information in that application will be used by the students.

Which column can be repaired?
Mother's name
Father's name
Gender
Category
Person with Disability
State Code Eligibility
Nationality

The link on the website has been activated for repair. Students can amend the application till 5 pm on September 30, 2020. The deadline for collection of fees is September 30, 2020 at 11.50 pm.

Will I have to repay the fee?

The circular states that whether or not the application will have to be re-charged will depend on the type of amendment to be made. If you want to repair a column for which you have to pay extra, you can do so through credit, debit card, net banking or UPI.

Don't make this mistake

The NTA has stated that any request to amend the application by email, fax or other means will not be accepted. You need to complete this process yourself by visiting the website.

To read the NTA's circular

Click here to see the ad


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda