MPSC परीक्षा होणार या तारखेला

By Naukari Adda Team


MPSC परीक्षा होणार या तारखेला, MPSC exam will be held on this date

6 ऑक्ट : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसारच ही परीक्षा होणार असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. परीक्षा आणि भरती दोन्ही शासनाच्या निर्णयानुसार होणार आहेत असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे. काही मराठा संघटनांनी MPSCच्या परीक्षांना विरोध केला होता.जोपर्यंत मराठा आरक्षणाचा कोड सुटत नाही तोपर्यंत परीक्षा स्थगित ठेवण्याची मागणी काही मराठा संघटनांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मराठा आरक्षाच्या प्रश्नावर मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी मुंबईतल्या MPSC कार्यालयाला घेराव घातला. MPSC परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंगळवारी आपली भूमिका जाहीर केली. ठरलेल्या तारखेला म्हणजे 11 ऑक्टोबरलाच पूर्व परीक्षा होणार असल्याचं आयोगाने आज जाहीर केलं. 

या आधी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा प्रवर्ग निश्चित होत नाही तोपर्यंत MPSCच्या परीक्षा घेऊ नये अशी त्यांची मुख्य मागणी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेऊन त्याचा निकाल हा मराठा आरक्षणाची स्थगिती उठल्यानंतर निकाल जाहीर करू ही घेतलेली भूमिका म्हणजे निव्वळ मराठा समाजातील विद्यार्थ्यांची फसवणुक आहे असा संघटनेचा आरोप आहे. जर एखादा व्यक्ती परीक्षा झाल्यानंतर कोर्टात गेल्यास विरोधात निकाल येऊ शकतो. जर वयाच्या संदर्भात दुमत असेल तर एक वर्ष वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी केली आहे.

देशातील अनेक राज्यांनी 50 टक्या पेक्षा अधिकचं आरक्षण दिलं आहे, सुप्रीम कोर्टाने आजपर्यंत कुठल्याही प्रकरणात स्थगिती दिलेली नाही. फक्त महाराष्ट्रासाठी वेगळा निर्णय का घेतला गेलाय, याचं कारण शोधलं गेलं पाहिजे, अशा प्रतिक्रिया मराठा आंदोलकांकडून येत आहेत. 2018 तत्कालीन महाराष्ट्र सरकारने कायदा करून मराठा आरक्षण आणलं होतं. त्यानुसार शिक्षण संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती.या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

मुंबई उच्च न्यायालयाने कायदा घटनेनुसारच असल्याचं सांगत आरक्षण कायम ठेवलं पण 16 टक्के ऐवजी कमी कोटा असावा, असं सांगितलं. मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात काही संस्थांनी आव्हान दिलं. घटनेनुसार, 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही. मग महाराष्ट्र सरकारने ते कसं दिलं, असा सवाल करत याला आव्हान देण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MPSC exam will be held on this date

By Naukari Adda Team


Oct 6:  The commission has said that the examination will be held as per the decision of the Supreme Court. The commission has also clarified that both the examination and recruitment will be held as per the decision of the government. Some Maratha organizations had opposed the MPSC exams. Some Maratha organizations had demanded that the exams be postponed till the code of Maratha reservation is released. The decision has been announced against that background. The Maratha Kranti Morcha on Monday cordoned off the MPSC office in Mumbai on the issue of Maratha reservation. The Maharashtra Public Service Commission (MPSC) on Tuesday announced its position as discussions continue on whether the MPSC exam will be held. The commission today announced that the pre-examination will be held on October 11, the scheduled date.

Earlier, leaders of Maratha Kranti Morcha had met Deputy Chief Minister Ajit Pawar. His main demand is not to take the MPSC exam until the reservation category of Maratha students is decided. The organization alleges that the role played by the Maharashtra Public Service Commission in conducting the state service pre-examination and announcing the results after the suspension of Maratha reservation was lifted is a deception of the students of the net Maratha community. If a person goes to court after the examination, the result may be against. Dhananjay Jadhav, coordinator of Maratha Kranti Morcha, has demanded that the age limit should be increased by one year.

Many states in the country have given reservations of more than 50 per cent, the Supreme Court has not given a stay in any case till date. The reason why a different decision has been taken only for Maharashtra should be found out, such reactions are coming from Maratha agitators. In 2018, the then Maharashtra government had brought Maratha reservation by law. Accordingly, provision was made to reserve 16 per cent seats for the Maratha community in educational institutions and government jobs. The law was challenged in court.

The Mumbai High Court upheld the reservation, saying it was in accordance with the law, but said the quota should be less than 16 per cent. This decision of the Mumbai High Court was challenged by some organizations in the Supreme Court. Incidentally, reservations above 50 per cent cannot be made. He was then challenged by asking how the Maharashtra government gave it. The Supreme Court has stayed him.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda