गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्‍वासन, पोलिस भरतीत 33 टक्के महिलांना संधी

By Naukari Adda Team


गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्‍वासन, पोलिस भरतीत 33 टक्के महिलांना संधी, Home Minister Anil Deshmukh

राज्यात नवीन 12 हजार पोलिसांची भरती होणार आहे. यामध्ये महिलांची 33 टक्के भरती होईल याची आम्ही काळजी घेऊ. महिलांच्या इतर प्रलंबित मागण्यांवरही लवकरात लवकर कार्यवाही करू, असे आश्‍वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिले.

महिलांवरील अत्याचार आणि महिलांचे इतर प्रलंबित प्रश्‍न घेऊन मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे महिला सुरक्षितता आणि दिशा कायदा यासंबंधी गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या आमदार, पदाधिकारी उपस्थित होत्या.

या वेळी आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, राज्यात पोलिस दलात सुमारे दोन लाख 22 हजार पोलिस आहेत. त्यामध्ये केवळ 29 हजार महिला पोलिस आहेत. खरे तर 33 टक्के आरक्षण गृहीत धरले तर सुमारे 70 हजारांवर महिला पोलिस असणे आवश्‍यक आहे. सामान्य महिला जेव्हा पोलिस ठाण्यात जाते त्या वेळी तेथे तक्रार नोंदवण्यासाठी महिला पोलिस असणे व्यथा मांडण्यासाठी अधिक सोईस्कर होते. पुरुष अधिकाऱ्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडणे खूप कठीण जाते.

महिला पोलिसांच्या सोईसुविधा, त्यांच्या कामाच्या वेळा आणि त्यांच्यासाठी असलेले शौचालय याचीही कमतरता आहे. त्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होतो. पोलिसांसाठी फिरती शौचालये असण्याची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर सुमारे आठ ते दहा महिन्यांपासून महिला आयोग अध्यक्षपद रिक्त आहे. हे तातडीने भरावे, असे आवाहनही त्यांनी गृहमंत्र्यांना केले.

 

 “दिशा कायदा’ची लवकरच! 
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा आणता येईल का, असा विषय सभागृहात मांडण्यात आला. या वेळी या कायद्याचा मसुदा तयार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. लवकरच हा कायदा आणला जाईल, याबद्दल सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले

                                                                              सोर्स: सकाळ


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Home Minister Anil Deshmukh's assurance that 33 per cent women will be given a chance in police recruitment

By Naukari Adda Team


12,000 new police personnel will be recruited in the state. We will ensure that 33 per cent of the women will be recruited. We will take action on other pending demands of women as soon as possible, assured Home Minister Anil Deshmukh here today.

A meeting was held at Sahyadri Guest House on Tuesday in the presence of Home Minister Anil Deshmukh, Minister of State for Home Affairs Satej Patil and Shambhuraje Desai on atrocities against women and other pending issues of women. Shiv Sena, NCP and Congress MLAs and office bearers were present in it.

At this time, MLA Dr. Manisha Kayande said there are about two lakh 22 thousand policemen in the state. There are only 29,000 women police in it. In fact, assuming 33 per cent reservation, there should be around 70,000 women police. When a normal woman goes to the police station, it is more convenient to have a female police officer to lodge a complaint. It is very difficult to express your grievances to male officers.

There is also a lack of facilities for women police, their working hours and toilets for them. It affects their work. There is a need for mobile toilets for the police. At the same time, the chairmanship of the Women's Commission has been vacant for about eight to ten months. He also appealed to the Home Minister to pay it immediately.

"Direction Act" coming soon!
The issue of whether a direction law can be brought on the lines of Andhra Pradesh was raised in the House. Home Minister Anil Deshmukh said the bill was ready at this time. He said the government was committed to enacting the law soon

                                                                         Source: Sakal 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda